Full Width(True/False)

BSNL ग्राहकांसाठी मोठी बातमी, ६० दिवसांसाठी वाढवली या प्लानची वैधता, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी ने आपल्या प्रीपेड मोबाइल ग्राहकांसाठी आपला सर्वात लोकप्रिय प्रीपेड प्लानची वैधता ६० दिवसांपर्यंत वाढवली आहे. बीएसएनएलने २३९९ रुपयाच्या या प्लानमध्ये रिचार्ज करणाऱ्या यूजर्संना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ६० दिवसाची अतिरिक्त वैधता देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. लेटेस्ट माहितीनुसार, बीएसएनएलच्या २३९९ रुपयाचा प्लान रिचार्ज केल्यास ग्राहकांना ४२५ दिवसाची वैधता दिली जाणार आहे. सर्व खासगी मोबाइल ऑपरेटर आपल्या टॅरिफ रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ करण्यात व्यस्त आहेत. तर बीएसएनएल ही एकमेव अशी सरकारी कंपनी आहे. टेलिकॉम बाजारात अतिरिक्त वैधतेचा प्रस्ताव आणत आहे. बीएसएनएलचा २३९९ रुपयाचा प्लान हा प्रमोशनल ऑफर सर्व टेलिकॉम सर्कल मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, बीएसएनएलने सर्व वैधता एक्सपायर्ड प्रीपेड मोबाइल ग्राहकांना इनकमिंग एसएमएसची सुविधेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही ऑफर ३१ मार्च २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे ग्राहकांना या दरम्यान फ्री इनकमिंग एसएमएस सुविधा मिळू शकते. यासाठी कोणताही अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही. BSNL च्या २३९९ रुपयाचे फायदे २३९९ रुपयाच्या प्लानमधील बेनिफिट्स पाहिल्यास यात तुम्हाला ४२५ दिवसासाठी रोज १०० एसएमएस, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज ३ जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लानमध्ये एकूण १२७५ जीबी इंटरनेट मिळणार आहे. या प्लानमध्ये Eros Now Entertainment चे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. सोबत पर्सनाइज्ड रिंग बॅक टोन (PRBT) सोबत तुम्हाला अनलिमिटेड साँग चेंजचे ऑप्शन सुद्धा दिले जाते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cFUEWs