Full Width(True/False)

Digital Gold काय आहे? पाहा Google Pay, PhonePe च्या माध्यमातून कसे कराल खरेदी?

नवी दिल्ली : गुंतवणूक म्हणून सोन्यात खरेदी करण्याला भारतीयांकडून आधीपासूनच पसंती दिली जाते. लोक खासकरून दुकानात जाऊन सोन्याचे दागिने अथवा नाणी खरेदी करतात. मात्र, आता ऑनलाइन खरेदी-विक्रीचे प्रमाण देखील वाढले आहे. काय आहे व यात गुंतवणूक कशी कराल, याबाबत जाणून घेऊया. वाचा: डिजिटल गोल्ड काय आहे? सोप्या शब्दात सांगायचे तर फिजिकल गोल्डच्या डिजिटल व्हर्जनला डिजिटल गोल्ड म्हटले जाते. डिजिटल गोल्डची खास गोष्ट म्हणजे तुम्ही १ रुपयापासून याची खरेदी करू शकता. फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणुकीसाठी ग्राहकांना ग्रॅमचा पर्याय मिळतो. मात्र, यात सर्वांना गुंतवणूक शक्य नसते. तर फिजिकल गोल्डमध्ये लोक आपल्या बजेटनुसार कितीही गुंतवणूक करू शकतात. फिजिकल गोल्डच्या तुलनेत डिजिटल गोल्ड हे अधिक सुरक्षित असतात. तुम्ही जोपर्यंत याची विक्री करत नाही तो पर्यंत हे सुरक्षित असतात. काही प्लॅटफॉर्म्स डिजिटल गोल्डला फिजिकल गोल्डमध्ये बदलण्याचा देखील पर्याय देतात. अनेक ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना एका क्लिकवर डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा पर्याय देत आहेत. यामध्ये आणि चा समावेश आहे. PhonePe द्वारे असे खरेदी करा सोने:
  • आधी तुमचे PhonePe अकाउंट सेट करा.
  • त्यानंतर स्क्रोलकरून इन्वेस्टमेंट कॅटेगरीमध्ये जा.
  • त्यानंतर Buy 24K Gold वर क्लिक करा.
  • आता लिस्टमधील खरेदी करायचे आहे ते गोल्ड कॉइन निवडा. येथे तुम्ही रक्कम देखील सहज टाकू शकता. विशेष म्हणजे १ रुपयात देखील सोने खरेदी करता येईल.
  • त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटद्वारे पेमेंट करा.
Google Pay द्वारे असे खरेदी करा सोने:
  • आधी अकाउंट सेट करा व तुमच्या बँक खात्याशी लिंक करा.
  • त्यानंतर स्क्रोल करून गोल्ड लॉकरवर या.
  • आता Buy Gold वर क्लिक करा व खरेदी करण्यासाठी रक्कम टाका. तुम्ही या सोन्याची कधीही विक्री करू शकता.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EVsCT9