Full Width(True/False)

Find your phone: IMEI नंबरचा वापर करून शोधू शकता हरवलेला स्मार्टफोन, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : आज प्रत्येकाच्या हातात असून, या डिव्हाइसमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. मात्र, स्मार्टफोन हरवला अथवा चोरीला गेल्यास मोठी समस्या निर्माण होते. परंतु, अशा स्थितीमध्ये तुम्ही थेट (International Mobile Equipment Identity) नंबरद्वारे तुमचा हरवलेला फोन शोधू शकता. वाचा: IMEI नंबर वापरून हरवलेल्या मोबाइल शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग एक मोबाइल अ‍ॅप आहे. या मोबाइल अ‍ॅपमध्ये फोनचा IMEI नंबर टाकून ट्रॅक करू शकता. विशेष म्हणजे फोनमध्ये सिम कार्ड, इंटरनेट अ‍ॅक्सेस आणि जीपीएस लोकेशन नसले तरीही याद्वारे फोन शोधता येईल. IMEI नंबर तुम्हाला फोनच्या बॉक्सवर मिळेल. नंबर बॉक्सवरील मॉडेल नंबर आणि सीरियल नंबर असलेल्या स्टिकरजवळ मिळेल. IMEI नंबर हा १५ आकडी असतो व बार कोडच्या वरती लिहिलेला मिळेल. IMEI नंबर मिळाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोरवरून मोफत IMEI इंस्टॉल करावे लागेल. अ‍ॅपला फोनमध्ये इंस्टॉल केल्यानंतर त्यात IMEI नंबर टाकून सर्च करा. यानंतर तुम्हाला फोनचे लोकेशन मेसेजद्वारे मिळेल. फोन हरवला अथवा चोरीला गेल्यास पोलिसात देखील IMEI नंबरसह तक्रार करावी. कारण पोलीस देखील IMEI नंबरद्वारे फोनला ट्रॅक करतात. तसेच, फोन खरेदी केल्यानंतर IMEI नंबर देखील स्वतः जवळ लिहून ठेवावा. दरम्यान, या फोन ट्रॅकर अ‍ॅपचा वापर करण्यापूर्वी त्याबाबतची संपूर्ण माहिती तपासून घ्यावी. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Hyzxnj