Full Width(True/False)

Fire-Boltt AI: आवाजाने कंट्रोल होणारी पहिली स्मार्टवॉच भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : फायर-बोल्टने भारतीय बाजारात एक नवीन लाँच केली आहे. या वॉचमध्ये कॉलिंग सपोर्ट दिला आहे. तुम्ही जर कमी बजेटमध्ये कॉलिंग स्मार्टवॉच शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. कंपनीचा दावा आहे की, ही पहिली वॉच आहे, जी वॉइस असिस्टेंट सपोर्टसह येते. पाहा: कंपनीने भारतात आपली लेटेस्ट स्मार्टवॉच एआयला लाँच केले आहे. या वॉचमध्ये वॉइस असिस्टेंट, ब्लूटूथ कॉलिंग फीचर, हार्ट रेट ट्रॅकर, SpO2 मॉनिटर सारखे फीचर्स मिळतात. वॉचचे वैशिष्ट्यं म्हणजे यात एआय वॉइस असिस्टेंट फीचर दिले आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, गुगल/सिरी वॉइस असिस्टेंटसह येणारी पहिली स्मार्टवॉच आहे. या फीचरसह हवामानाचे अपडेट मिळेल, म्यूझिक कंट्रोल करू शकता. वॉचचे अन्य वैशिष्ट्यं म्हणजे यात ब्लूटूथ कॉलिंग फीचर दिले आहे. यात दिलेल्या इन-बिल्ट स्पीकर आणि माइक सेटअपमुळे वॉचद्वारेच कॉल करू शकता. वॉचमध्ये २४०x२८० पिक्सल रिझॉल्यूशन १.७ इंच टच स्क्रीन डिस्प्ले दिला असून, यात बाजूला क्राउन बटन आहे. वॉच हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन सेच्यूरेशन, स्ट्रेस, बीपीसह अनेक ट्रॅकिंग फीचर मिळतात. तसेच, स्मार्टवॉच अलार्म, टायमर, सेकेंडरी रिमाइंडर, हवामान अपडेट, ब्राइटनेस कंट्रोल आणि मल्टीपल वॉच फेस सपोर्टसह येते. यात वॉचद्वारे म्यूझिक आणि कॅमेरा कंट्रोल देखील मिळतो. एकदा चार्ज केल्यानंतर वॉच १० दिवस चालते. यात नॉटिफिकेशन, डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपी६७ आणि १० स्पोर्ट्स मोड देखील दिले आहेत. फायर-बोल्ट एआय स्मार्टवॉच ब्लॅक, ब्लू, ग्रे आणि पिंक रंगात येते. या वॉचला तुम्ही आजपासून फ्लिपकार्टवरून ४,४९९ रुपयात खरेदी करू शकता. पाहा: पाहा: पाहा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kIID71