Full Width(True/False)

HP च्या या स्लीम आणि हलक्या लॅपटॉपवर अशी मिळवा २७ हजारांहून जास्त सूट, जाणून घ्या

नवी दिल्लीः बिग बिलियन डेज (Big Billion Days) आणि एक दिवाळी सेल नंतर फ्लिपकार्ट आणखी एक दिवाळी सेल घेवून आली आहे. २८ ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या या बिग दिवाळी सेल (Big Diwali Sale) मध्ये युजर्सला इलेक्ट्रॉनिक्स पासून अनेक वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे. महागडे प्रोडक्ट्स ला तुम्ही स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. आज आम्ही तुम्हाला एचपीच्या एका लॅपटॉपवर मिळणारी डील संबंधी सांगणार आहोत. यात २७ हजार रुपयांहून जास्त फायदा मिळू शकतो. जाणून घ्या डिटेल्स. एचपीच्या लॅपटॉपवर अशी मिळवा २७ हजार रुपयांहून जास्त सूट फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल मध्ये तुम्हाला ४६ हजार रुपये किंमतीचा वर तुम्हाला २७ हजार ६६५ रुपयाची सूट मिळू शकते. या लॅपटॉपवर या सेलमध्ये १५ टक्क्यांची सूट दिली जात आहे. त्यामुळे याची किंमत ३८ हजार ९९० रुपये झाली आहे. जर तुम्हाला या लॅपटॉपची पेमेंट एसबीआयच्या क्रेडिट कार्डवरून केली तर तुम्हाला १५०० रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट आणखी मिळेल. सोबत, तुम्ही आपल्या जुन्या लॅपटॉपला एक्सचेंज केल्यास तुम्हाला १८ हजार १०० रुपयाची बचत करता येवू शकते. यासोबतच तुम्हाला एक हजार रुपयाची एक्स्ट्रा सूट मिळू शकते. याप्रमाणे एकूण मिळून तुम्ही या डील मध्ये २७ हजार ६६५ रुपयापर्यंत बचत करू शकता. ४६ हजार रुपयाचा लॅपटॉप तुम्ही १८ हजार ३९० रुपयात घरी घेवून जावू शकता. या लॅपटॉप मध्ये काय आहे खास विंडोज १० होमला सपोर्ट करणाऱ्या या एचपीच्या लॅपटॉप मध्ये १५.६ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले सोबत लाँच करण्यात आला होता. यात तुम्हाला 8GB RAM च्या सोबत 256GB एसएसडीची सुविधा मिळते. बिल्ट इन ड्युअल स्पीकर्स आणि ड्युअल ऐरे डिजिटल मायक्रोफोन्स सोबत यात तुम्हाला एचपीचे ट्रू व्हिजन 720p एचडी कॅमेरा सुद्धा मिळेल. हे प्रोडक्ट एका वर्षाच्या वॉरंटीसोबत येते. हा सेल ३ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CCQaez