Full Width(True/False)

१० दिवसांच्या बॅटरी लाइफसह Huawei ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच, पाहा ऑफर

नवी दिल्ली : ला भारतात लाँच करण्यात आले असून, वॉचला ऑगस्ट महिन्यात जागतिक बाजारात सादर केले होते. या स्मार्टवॉचमध्ये मोठा डिस्प्ले, २४x७ हार्ट रेट मॉनिटर आणि १० दिवसांची बॅटरी लाइप दिली आहे. सोबतच, १.६४ इंच विविड एमोलेड डिस्प्ले आणि ९७ पेक्षा अधिक वर्कआउट मोड्स यात मिळतात. वाचा: Watch Fit ची किंमत ८,९९० रुपये असून, वॉचला Amazon वरून आजपासून खरेदी करू शकता. वियरेबल पिंक, ब्लू आणि ब्लॅक रंगात येते. या वॉचच्या खरेदीवर Huawei Mini Speaker मोफत मिळेल. Huawei Watch Fit चे स्पेसिफिकेशन्स या स्मार्टवॉचमध्ये १.६४ इंच एचडी एमोलेड डिस्प्ले दिला आहे. यात यूजर्सला १३० पेक्षा अधिक कस्टमाइज वॉच फेस मिळतील. यामध्ये ९७ पेक्षा अधिक वर्कआउट मोड्स मिळतात. यापैकी ११ प्रोफेशनल वर्कआउट मोड्स आहेत. या वॉचमध्ये १२ अ‍ॅनिमेटेड फिटनेस कोर्स बिल्ट इन आहे. याद्वारे यूजर्सला स्मार्टफोनमध्ये मोफत वन-ऑन वन पर्सनल ट्रेनिंग मिळेल. वॉचमध्ये हार्ट रेट, स्लीप, मेंस्ट्रूअल सायकल आणि ब्लड ऑक्सिजन सेंसर सारखे फीचर्स दिले आहेत. यात कंपनीचे TruSeen ४.९ हार्ट रेट मॉनिटरिंग आणि स्लीप ट्रॅकर देखील किले आहे. कंपनीचा दावा आहे की याची बॅटरी १० दिवस टिकेल. तसेच, अर्ध्या तासात ७० टक्के चार्ज होते. याशिवाय फक्त ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये दिवसभर देखील वापरू शकता. तसेच, वॉचद्वारे यूजर्सला एसएमएस मेसेज, इनकमिंग कॉल्स आणि कॅलेंडर अ‍ॅप्सचे अलर्ट्स मिळतील. सोशल मीडिया अ‍ॅप्सचे नॉटिफिकेसन देखील मिळेल. याशिवाय म्यूझिक, कॅमेरा कंट्रोल, वेदर अपडेट, अलार्म, टायर आणि स्टॉपवॉच सारखे फीचर्स दिले आहे. वॉच ५एटीएम पर्यंत टर रेसिस्टेंट असून, अँड्राइड आणि आयओएसला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k0xZYS