Full Width(True/False)

BSNL तर्फे ग्राहकांना दिवाळी ऑफर, 'या' रिचार्जवर मिळणार ९० % डिस्काउंट, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली : माहितीनुसार, ने एक विशेष सवलत योजना सुरू केली आहे, जिथे नवीन ग्राहक मासिक रेंटलमध्ये ९०% पर्यंत कमाल सवलत मिळवू शकतात. ही योजना केवळ नवीन ग्राहकांसाठी लागू असेल ज्यांचे कनेक्शन ऑफर कालावधी दरम्यान सक्रिय असेल. पाहा डिटेल्स. वाचा: अशी मिळवा ९० % पर्यंत सूट : BSNL ने आगामी काळात FTTH व्यवसाय वाढवण्यासाठी ही आकर्षक ऑफर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लानमुळे BSNL च्या FTTH व्यवसायात निश्चितच मासिक वाढ होईल. तुम्हाला दिवाळीच्या या ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास, फक्त भारत फायबर (FTTH) कनेक्शन BSNL पोर्टलवर किंवा BSNL ग्राहक सेवा केंद्रांवर (BSNL CSC) बुक करावे लागेल . BSNL दिवाळी विशेष सवलत प्लान १ नोव्हेंबर २०२१ पासून ९० दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे. याचा अर्थ १ नोव्हेंबर २०२१ ते २९ जानेवारी २०२२ पर्यंत सक्रिय असलेले नवीन BSNL FTTH कनेक्शन या दिवाळी विशेष ९० % सवलतीचा लाभ घेऊ शकतात. केरळ टेलिकॉमच्या अहवालानुसार, BSNL नोव्हेंबर २०२१ मध्ये सक्रिय असलेल्या सर्व नवीन भारत फायबर कनेक्शनसाठी मासिक रेंटलमध्ये ९० % सूट देईल. ग्राहक कोणत्याही FTTH प्लानमध्ये जास्तीत जास्त ५०० रुपये सवलत मिळवू शकतात. याचा अर्थ तुम्ही तुमच्या BSNL FTTH कनेक्शनसाठी कोणताही प्लान निवडाल, तर तुम्ही तुमच्या पहिल्या महिन्याच्या बिलावर ५०० रुपयांची ची कमाल सूट मिळवू शकता. या दिवाळी स्पेशल डिस्काउंट ऑफर व्यतिरिक्त, नवीन BSNL FTTH ग्राहकांना खाली तपशीलवार आकर्षक सवलती दिल्या जात आहेत. BSNL FTTH प्लान्सचे फायदे : BSNL FTTH प्लान्स अंदमान आणि निकोबार दूरसंचार मंडळ वगळता देशात सर्वत्र उपलब्ध आहेत. BSNL FTTH योजना कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलसह ३० Mbps ते ३०० Mbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड प्रदान करतात. BSNL FTTH ग्राहक कोणत्याही अतिरिक्त भाडे किंवा शुल्काशिवाय बंडल व्हॉइस कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. सर्व BSNL FTTH योजना मोफत व्हॉइस कॉलिंग फायदे देतात. फायबर बेसिक, फायबर व्हॅल्यू, फायबर प्रीमियम आणि फायबर अल्ट्रा सारख्या नव्याने लॉन्च झालेल्या सर्व BSNL FTTH प्लान भारत भरातील नवीन आणि विद्यमान ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jYuXV8