Full Width(True/False)

दमदार फीचरचा Infinix Note 11 लाँच, फोनमध्ये ६.८ इंचाचा मोठा डिस्प्ले

नवी दिल्लीः गेल्या महिन्यात Infinix ने ग्लोबल बाजारात Pro ची घोषणा केली होती. त्यावेळी वेनिला नोट ११ च्या काही प्रमुख फीचर्सची माहिती आली होती. इनफिनिक्स नोट 11 आता अधिकृत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने याच्या सर्व स्पेसिफिकेशन आणि फीचर्ससोबत लिस्टेड करण्यात आले आहे. Infinix Note 11 चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स Infinix Note 11 मध्ये 6.7 इंचाची AMOLED स्क्रीन दिली आहे. ज्यात एक ड्यूड्रॉप नॉच दिला आहे. हा 1080 x 2400 पिक्सलचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन, ६५० निट्स पीक ब्राइटनेस, 100000:1 कंट्रास्ट रेशियो, 100 टक्के डीसीआई-पी3 कलर गॅमेट आणि ९१ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो देते. डिव्हाइस एक स्लीम डिझाइनला सपोर्ट करते. नोट प्रो ११ मध्ये Helio G96 चिपसेट दिले आहे. तर वेनिला मॉडल Helio G88 चिपसेट सोबत येते. डिव्हाइस दोन व्हेरियंट मध्ये येते. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मध्ये येते. या डिव्हाइस मध्ये अधिक स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे. Infinix Note 11 मध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. याच्या रियर कॅमेरा मॉड्यूल मध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, २ मेगापिक्सलचा बोकेह लेन्स, AI लेन्स आणि एक एलईडी फ्लॅश दिला आहे. Note 11 मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. डिव्हाइस फेस अनलॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सारखी सिक्योरिटी फीचर्स सोबत येते. Infinix Note 11 ची किंमत Infinix Note 11 ची किंमत संबंधी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याच्या आशियाई आणि आफ्रिकी बाजारात लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनला तीन रंगात जसे, लेस्टियल स्नो, ग्लेशियर ग्रीन आणि ग्रेफाइट मध्ये लाँच करण्यात येणार आहे. Infinix ने नुकतेच स्पष्ट केले होते की, ते डिसेंबर मध्ये भारतात Note 11 सीरीज आणि INBook X1 लॅपटॉपची घोषणा करणार आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EGNUUd