Full Width(True/False)

IRCTC चा पासवर्ड विसरला असाल तर 'असा' करा मिनिटांत जनरेट, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ट्रेन तिकीट बुक करताना लॉगिन आयडी आणि पासवर्ड आवश्यक आहे. युजर आयडी आणि पासवर्डशिवाय आपण ट्रेनचे तिकीट ऑनलाइन बुक करू शकत नाही. अशा परिस्थितीत रेल्वे तिकीट बुक करताना दोघांनाही विशेष महत्त्व आहे. त्याच वेळी, काही युजर्स रेल्वे तिकीट बुक करताना त्यांचा युजर आयडी, लॉगिन, पासवर्ड विसरतात. अशा परिस्थितीत त्यांना अनेक समस्यांना समोरे जावे लाग ते . पण, तुम्ही सहज तुमचा विसरलेला IRCTC पासवर्ड कसा रिजनरेट करू शकता. जाणून घ्या IRCTC लॉगिन आयडीचा पासवर्ड कसा रिजनरेट करायचा. वाचा: फॉलो करा या सोप्प्या स्टेप्स: यासाठी प्रथम तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइट https://ift.tt/37f46xe ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्याय निवडावा लागेल. आता तुम्हाला Forgot Password या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला कॅप्चा कोड भरल्यानंतर तुमचा यूजर आयडी आणि जन्मतारीख टाकावी लागेल आणि पुढील पर्याय निवडावा लागेल. काही वेळाने तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर येईल. बॉक्समध्ये तो OTP टाकल्यानंतर, तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड तयार करू शकाल. नवीन पासवर्डसह, तुम्ही तुमच्या IRCTC खात्यात लॉग इन करून पुन्हा सहजपणे ट्रेन तिकीट बुक करू शकाल. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलने तुमच्या घरच्या- घरी आरामात हे करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31OJGf9