Full Width(True/False)

मस्तच! Jio आणि Airtel च्या प्रीपेड प्लान्सवर खास ऑफर, कॅशबॅक-कूपन्सचा मिळेल फायदा

नवी दिल्ली : ने काही दिवसांपूर्वी आपल्या काही प्रीपेड प्लान्ससह कॅशबॅक ऑफरची घोषणा केली होती. ग्राहक आताही या कॅशबॅक ऑफरचा फायदा My Jio ऐप या Jio अ‍ॅपच्या वेबसाइटवरून रिचार्ज केल्यावर मिळेल. वाचा: Jio ची कॅशबॅक ऑफर २४९ रुपये, ५५५ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लान्सवर मिळते. २४९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी ५० रुपये, ५५५ रुपयांच्या प्लानवर १११ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लानवर १२० रुपये कॅशबॅक देत आहे. या प्रीपेड प्लान्सवर रिचार्ज केल्यावर ग्राहकांना २० टक्के कॅशबॅक मिळेल. या कॅशबॅकचा वापर Jio Mart, Reliance Digital, Jio रिचार्ज व इतर गोष्टी खरेदीसाठी होईल. देखील आपल्या अनेक प्लान्सवर डेटा कूपन्स देत आहे. हे फ्री डेटा कूपन ठराविक ग्राहकांनाच मिळेल. ग्राहकांना डेटा कूपन मिळाल्यास एसएमएसद्वारे याची माहिती दिली जाते. अ‍ॅपच्या My Coupons सेक्शनमध्ये जाऊन कूपन क्लेम करता येईल. या ऑफरमध्ये यूजर्सला अतिरिक्त डेटा देखील मिळतो. कंपनीच्या २८९ रुपये, ५९९ रुपये, ३४९ रुपये, ३९८ रुपयांसह अनेक प्रीपेड प्लान्सवर या ऑफरचा लाभ मिळत आहे. Airtel २४९ रुपयांच्या प्लानसह अतिरिक्ते डेटा ऑफर करत आहे. या प्लानसोबत कंपनी दररोज ०.५ जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. यासाठी यूजर्सला Airtel Thanks अ‍ॅपमधून अतिरिक्त डेटा दररोज रिडीम करावा लागेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kCHAW5