नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी LAVA आपला पहिला 5G स्मार्टफोन LAVA Agni देशांतर्गत बाजारात आज, म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, आगामी स्मार्टफोन मध्ये HD डिस्प्ले, चार कॅमेरे आणि Dimensity 810 प्रोसेसर दिले जाऊ शकतात. याशिवाय, आगामी हँडसेटमध्ये युजर्सना जलद चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी मिळू शकते. पाहा डिटेल्स. वाचा: LAVA Agni 5G लाँच इव्हेंट: LAVA Agni 5G स्मार्टफोनच्या लाँच इव्हेंटचे Live Streaming दुपारी १२ वाजता सुरू होईल. कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल. LAVA Agni 5G चे संभाव्य तपशील: जर लीक्सवर विश्वास ठेवला तर, LAVA Agni 5G स्मार्टफोन FHD + LCD डिस्प्लेसह येईल. ज्याचा रिफ्रेश दर ९० Hz असेल. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सुविधा दिली जाऊ शकते. याशिवाय स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आणि मोठे स्टोरेज सपोर्ट केले जाऊ शकते. त्याच वेळी, हे डिव्हाइस Android 11 आउट-ऑफ-द-बॉक्सवर काम करेल. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, LAVA Agni 5G स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची अपेक्षा आहे. यात ६४ MP मुख्य लेन्स असू शकतात. परंतु अद्याप इतर कॅमेरा सेन्सर आणि सेल्फी कॅमेराबद्दल माहिती मिळालेली नाही. बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी: लावा अग्नी स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी दिली जाऊ शकते.जी,फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. याशिवाय यूजर्सना स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा सपोर्ट मिळेल. LAVA Agni 5G ची अपेक्षित किंमत: आतापर्यंत समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, LAVA Agni 5G ची किंमत १९,००० ते २०,००० रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते. डिव्हाईसच्या खऱ्या किमतीची माहिती लॉंचिंग इव्हेंटनंतरच मिळणार आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bRfgKY