नवी दिल्ली : एंट्री-लेव्हल स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्ससह सिंगापूरमध्ये लाँच करण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये ६.५१ -इंचाचा डिस्प्ले आहे आणि तो Android 11 (Go Edition) वर काम करतो . फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर बाजूला बसवलेला आहे. तर फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. वाचा: Vivo Y15s स्मार्टफोन सिंगापूरमध्ये मिस्टिक ब्लू आणि वेव्ह ग्रीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच्या सिंगल ३ GB + ३२ GB व्हेरिएंटची किंमत SGD १७९ (सुमारे ९,८०० रुपये) आहे. Vivo Y15s चे स्पेसिफिकेशन्स : ड्युअल-सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Android 11 (Go Edition) आधारित Funtouch OS 11.1 वर काम करतो. आणि त्यात ६.५१ -इंचाचा HD+ (७२० x१६०० pixels) IPS LCD डिस्प्ले आहे. हा Vivo फोन ३ GB रॅम आणि ३२ GB स्टोरेजसह MediaTek Helio P35 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. या फोनमध्ये एक्सटेंडेड रॅम फीचर देण्यात आले आहे. हे रॅम म्हणून १ GB स्टोरेज वापरते. फोटोग्राफीसाठी, Vivo Y15s च्या मागील बाजूस १३ MP प्राथमिक कॅमेरा आणि २ MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच्या समोर, सेल्फीसाठी ८ MP कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये , यात मायक्रो-यूएसबी पोर्ट, ४ जी, ब्लूटूथ v5.0 आणि वाय-फायसाठी समर्थन आहे. येथे फिंगरप्रिंट सेन्सर बाजूला बसवलेला आहे. या फोनची बॅटरी ५,००० mAh आहे आणि येथे १० W चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. सर्वोत्तम गेमिंगसाठी मल्टी-टर्बो ३.० तंत्रज्ञान देखील येथे समर्थित आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wu6r3i