नवी दिल्ली : स्मार्टफोन सेगमेंटमध्ये कमी किंमतीत दमदार फीचर्स देणारी चीनची कंपनी आता अन्य गॅजेट्स व इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्समध्ये देखील नवनवीन प्रयोग करत आहे. कंपनीचे असेच एक शानदार प्रोडक्ट स्मार्ट डोर लाँच सिस्टम हे आहे. नावाचे हे सिस्टम 3D फेस लॉकसह येते. वाचा: शाओमीचे हे स्मार्ट डोर लॉक सेटिंगमध्ये नोंदणी केलेल्या लोकांच्या चेहऱ्यानेच उघडते. या स्मार्ट लॉकमध्ये काय खास आहे त्याबाबत जाणून घेऊया. या स्मार्ट लॉकमध्ये कंपनीने 3D facial recognition scanning सिस्टमचा वापर केला आहे. यात डॉट प्रोजेक्टर, इंफ्रारेड लाइट, RGB कॅमेऱ्यासह लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि इंफ्रारेट कॅमेरा दिला आहे. फेस अनलॉकशिवाय हे स्मार्ट लॉक फिंगरप्रिंट, पासवर्ड आणि NFC द्वारे देखील उघडते. कंपनीचा दावा आहे की, ही सिस्टम खूपच सुरक्षित असून, याला उघडणे अशक्य आहे. स्मार्ट लॉकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एखादी अनोळखी व्यक्ती समोर आल्यास त्वरित घराच्या मालकाला नॉटिफिकेशन जाते. या डोर लॉकमध्ये ६२५० एमएएचची बॅटरी दिली आहे, जी रिचार्जेबल आहे. अॅपला करू शकता कनेक्ट या स्मार्ट लॉकला तुम्ही Xiaomi आणि Mijia अॅपला कनेक्ट करू शकता. अॅपद्वारे अनेक फीचर्स कंट्रोल करता येतील. हे लॉक Apple Homekit ला देखील सपोर्ट करते. तसेच, अॅपद्वारे पाहू शकता की कोणत्या व्यक्तीने लॉकला अॅक्सेस केले आहे. डोर लॉक समोर येणाऱ्या व्यक्तीचा फोटो देखील काढतो. कंपनीने या स्मार्ट लॉकच्या किंमतीचा अद्याप खुलासा केलेला नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3H4xEi1