ठेवतात हे , सेकंदात होऊ शकतात क्रॅक नवी दिल्ली : ऑनलाइन बँकिंग, , जीमेल, सोशल मीडियासह अनेक गोष्टींच्या सुरक्षेसाठी मजबूत पासवर्ड असणे गरजेचे आहे. पासवर्ड मॅनेजमेंट सर्व्हिस नॉर्डपासने एक रिपोर्ट जारी केला असून, यात भारतीय यूजर्स वापरत असलेल्या सर्वात लोकप्रिय पासवर्डची माहिती दिली आहे. या रिपोर्टमध्ये पासवर्ड क्रॅक करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची देखील माहिती दिली आहे. वाचा: रिपोर्टनुसार, १२३४५६, १२३४५६७८९, ११११११ आणि १२३४५ हे पासवर्ड जगभरातील यूजर्सकडून वापरले जातात व या पासवर्ड्सला क्रॅक करण्यासाठी एक सेकंद देखील लागत नाही. साधारण पासवर्ड जसे की क्वर्टी, पासवर्ड, ड्रॅगन आणि मनीचा देखील सर्वसाधारणपणे वापर केला जातो. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, asdfghjkl, asdfgh आणि १४७२५८३६९ हे पासवर्ड देखील सेकंदात हॅक केले जाऊ शकतात. भारतामध्ये सर्वाधिक १२३४५, १२३४५६, १२३४५६७८९, १२३४५६७८, india१२३, १२३४५६७८९०, १२३४५६७, qwerty, abc१२३, iloveyou, xxx सह अन्य काही पासवर्डचा वापर केला जातो. रिपोर्टनुसार, india१२३ सोडून अन्य सर्व पासवर्डला क्रॅक करण्यासाठी १ मिनिटं देखील लागत नाही. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतासह जगभरातील यूजर्स सोपे पासवर्ड ठेवतात, जे क्रॅक करणे सहज शक्य आहे. रिपोर्टनुसार, जगभरातील बहुतांश लोकं पासवर्डसाठी आपल्या नावाचा उपयोग करतात. रिपोर्टमध्ये फुटबॉल क्लब लिव्हरपूलच्या लोकप्रियतेबाबत देखील सांगितले आहे. कराण लोक पासवर्ड म्हणून याचा देखील वापर करतात. Ferrari आणि Porsche या कारची नावे देखील पासवर्ड म्हणून लोकप्रिय आहेत, मात्र यांना सहज क्रॅक केले जाऊ शकते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ntkymz