Full Width(True/False)

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना झटका, अवघ्या एका महिन्यात १.९ कोटी कनेक्शन गमावले, या कंपनीला झाला मोठा फायदा

नवी दिल्लीः यांना जोरदार झटका बसला आहे. त्यांच्या रिलायन्स जिओने सप्टेंबर २०२१ महिन्यात १.९ कोटी कनेक्शन गमावले आहेत. तर त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी भारती एअरटेलने या दरम्यान २.७४ लाख नवीन मोबाइल ग्राहक जोडले आहेत. वोडाफोन आयडियाच्या कनेक्शन मध्येही १०.७७ लाखांची कमी झाली आहे. ही माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने आकडेवारी सादर करून दिली आहे. या आकडेवारीच्या माहितीनुसार, देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या सप्टेंबर पर्यंत ४२.४८ कोटी मोबाइल ग्राहक होते. परंतु, सप्टेंबर महिन्यात त्यांनी १.९ कोटी कनेक्शन गमावले आहे. या दरम्यान, एअरटेलच्या ग्राहकांची संख्या ३५.४४ कोटी झाली आहे. जी ऑगस्ट मध्ये ३५.४१ कोटी होती. तसेच वोडाफोन आयडिया कनेक्शन मध्ये १०.७७ लाख घसरण झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, ने सप्टेंबर मध्ये तिमाहीत परिणामांची घोषणा करताना ग्राहकांच्या संख्येत घसरण होईल, असा अंदाज वर्तवला होता. या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात एकूण वायरलेस कनेक्शनची संख्या कमी होवून ती ११६.६० कोटी वर पोहोचली आहे. ही आकडेवारी ऑगस्ट मध्ये ११८.६७ कोटीवर होती. रेडमी इंडियाने ५जी टेस्टिंगसाठी जिओशी हातमिळवणी शाओमी इंडियाचे सब ब्रँड रेडमी इंडियाने आपल्या आगामी रेडमी नोट ११ ५ जी स्मार्टफोनच्या टेस्टिंगसाठी रिलायन्स जिओशी हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपन्यांनी एकत्र चाचणी केली आहे. या दरम्यान, मोबाइल उपकरणांची चाचणी केली आहे. शाओमी इंडियाचे मुख्य सीओओ मुरलीकृष्णन बी यांनी म्हटले की, आम्ही भारतातील पहिली कंपनी आहोत. ज्याने २०१७ मध्ये रेडमी नोट ४ ला बाजारात उतरवून पहिला ४जी स्मार्टफोन लाँच केला होता. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oRCtmu