Full Width(True/False)

OnePlus Launch : OnePlus चा हा लेटेस्ट स्मार्टफोन लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : OnePlus ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus 9RT १३ ऑक्टोबर रोजी चीनमध्ये लाँच केला असून हा फोन भारतात याच महिन्यात लाँच होईल असे सांगण्यात येत होते. मात्र, कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. OnePlus 9RT लाँचच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वाचा: टिपस्टर मुकुल शर्माने याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, OnePlus 9RT ला Google सपोर्टेड डिव्‍हाइस सूची आणि लिस्ट वेबसाइटवर थोड्या वेगळ्या नावाने लिस्ट करण्यात आले आहे. लिस्टनुसार, OnePlus 9RT भारतात OnePlus RT नावाने लाँच केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अधिक माहिती समोर येतपर्यंत याबाबत काहीही नक्की सांगता येणार नाही. OnePlus 9RT चे डिटेल्स: OnePlus 9RT मध्ये ६.६२ इंचाची E4 OLED स्क्रीन आहे. त्याचा रिफ्रेश दर १२० Hz आहे. त्याची शिखर ब्राइटनेस १३०० nits पर्यंत आहे. हे HDR10+ सर्टिफिकेशन सपोर्टसह येते. यात Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आहे. OnePlus 9RT मध्ये १२ GB पर्यंत RAM आणि २५६ GB पर्यंत Internal स्टोरेज आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा ५०-मेगापिक्सेल आहे. यात १६ मेगापिक्सलचा वाइड-अँगल आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आहे. याच्या फ्रंटमध्ये सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ४,५०० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हे Warp Charge ६५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. टिपस्टरने यापूर्वी दावा केला होता की भारतात याची किंमत ४०,००० ते ४४,००० रुपये असू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nCKbBf