Full Width(True/False)

OPPO Pad ची किंमत आली समोर, पाहा तुमच्या बजेट मध्ये आहे की नाही

नवी दिल्लीः या आठवड्याच्या सुरुवातीत ओप्पो पॅडचा प्रोटोटाइप एक लीक फोटो ट्विटरवर दिसला होता. जवळपास त्याच वेळी समोर आलेल्या काही स्क्रीनशॉट वरून टॅबलेटचे काही प्रमुख स्पेसिफिकेशन्सची माहिती उघड झाली होती. आता टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशनने याच्या किंमती सोबत डिव्हाइसची काही अतिरिक्त डिटेल्स शेयर केले होते. मध्ये काय असेल खास टिप्स्टरच्या माहितीनुसार, मध्ये एक एलसीडी स्क्रीन असेल. जी 120Hz रिफ्रेश रेट देते. यात १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. मागील लीक वरून हे उघड झाले होते की, ११ इंचाचा डिस्प्ले आहे. हे स्नॅपड्रॅगन ८७० मोबाइल प्लॅटफॉर्मवर काम करणार आहे. डिव्हाइसच्या ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी बिल्ट इन स्टोरेज सोबत येण्याची शक्यता आहे. टॅबच्या कलरओएस १२ बेस्ड अँड्रॉयड १२ सोबत येण्याची शक्यता आहे. कस्टमाइज्ड यूआय मध्ये डॉक बार आणि डेस्क टॉप विजेट सारखी टॅबलेट फोक्स्ड फीचर असण्याची शक्यता आहे. यूआयवरून स्मार्टफोन, स्मार्टवॉच, हेडफोन आणि अन्य डिव्हाइसच्या फक्त इंटरकनेक्टेड ऑपरेशन असण्याची शक्यता आहे. OPPO Pad: किंमती किती, जाणून घ्या आज लीक झालेल्या माहितीवरून ओप्पो पॅडची किंमत जवळपास २०० युआन म्हणजेच जवळपास २३ हजार २३३ रुपये असेल. OPPO Pad डिवाइसचे अधिकृत नाव नाही आहे. शक्यता अशी आहे की, कंपनी याला अन्य नावाने लाँच करू शकते. OPPO Pad: कधी पर्यंत होणार लाँच ओप्पो पॅडच्या लाँचिंग डेटवरून सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. कंपनी या महिन्यात किंवा डिसेंबरच्या अखेरपर्यंत याची घोषणा करू शकते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3c7mTNn