नवी दिल्ली: Aadhaarकार्डाशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही तर, Pan कार्डशिवाय तुम्ही बँक खाते आणि आयटीआर भरू शकत नाही. म्हणूनच पॅन आणि आधार कार्ड हे आवश्यक कागदपत्र आहे. या दोन्ही कार्डांमध्ये सर्व माहिती असते. ज्याच्या आधारे तुमचे जुने रेकॉर्ड, पत्ता, फोन नंबर आणि बँकेशी संबंधित तपशील सहज मिळू शकतात. वाचा: जर यात थोडी चूक झाली तर ही सर्व माहिती चुकीच्या हातात पडू शकते आणि तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही त्यांचा वापर करता त्यावेळी काळजी घेणे आवश्य्क आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या फॉलो करुन तुम्ही फसवणूक टाळू शकता. अनोळखी लोकांसोबत तपशील शेअर करू नका: आधार कार्ड आणि पॅनशी संबंधित माहिती अज्ञात व्यक्तींसोबत शेअर करू नये. तुम्ही आधार क्रमांक कोणाशी शेअर करत असाल तर त्याचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाईल ते शोधा. आधार आणि पॅन कार्डच्या दोन्ही छायाप्रती घरी आणायला विसरू नका. तुमच्या वैयक्तिक संगणक आणि फोनवरून तुमच्या कागदपत्रांच्या सर्व डिजिटल प्रती काढून टाका. यासोबतच, जेव्हाही कोणाला आधार आणि पॅनची फोटो कॉपी द्यायची असेल, तेव्हा चेकप्रमाणे ती नक्कीच क्रॉस करा. पॅन, आधारची फोटोकॉपी सोबत ठेवा: नेहमी पॅन आणि आधार कार्डची फोटो कॉपी सोबत ठेवावी. कारण ही कागदपत्रे कधीही कुठेही लागतात.तसेच, आधार आणि पॅन कार्डची मूळ प्रत इतर कोणालाही फोटोकॉपीसाठी कधीही देऊ नका. कारण तो एकापेक्षा जास्त कॉपी करून तुमचे नुकसान करू शकतो. स्कोअर तपासत राहा: तुम्ही तुमचा क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL) स्कोअर वेळोवेळी तपासला पाहिजे. तुमच्या सिबिल पोर्टलमध्ये चुकीची एन्ट्री झाली असेल, तर तुम्ही फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता आहे. असे घडल्यास ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d0g1SE