Full Width(True/False)

स्मार्टफोनचा Pin-Password-Pattern विसरला? ‘या’ सोप्या स्टेप्सने घरबसल्या करू शकता अनलॉक; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : आपल्या सर्वांसाठीच आज किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याची गरज नाही. फोनमध्ये फोटो, व्हिडिओसह खासगी चॅट आपण सेव्ह करून ठेवत असतो. आपली खासगी माहिती सुरक्षित राहावी यासाठी फोनमध्ये लॉकचे फीचर मिळते. तुम्ही पिन, पॅटर्न अथवा फिंगरप्रिंटने फोन लॉक करू शकता. मात्र, फोनचा पासवर्ड अथवा पॅटर्न विसरल्याने फोन अनलॉक होत नाही, अशा स्थितीमध्ये मोठी समस्या निर्माण होते. वाचा: अशा स्थितीमध्ये तुम्हाला फोनचे लॉक उघडण्यासाठी लोकल शॉपमध्ये जावे लागते. मात्र, तुम्ही घरबसल्या सहज फोनला अनलॉक करू शकता. परंतु, यामुळे तुमचा सर्व डेटा डिलीट होईल. तुम्ही जर अँड्राइड यूजर असाल तर फोनला फॅक्ट्री रीसेट करू शकता. यासाठी खालील स्टेप्सला फॉलो करा.
  • तुमचा फोन बंद करा व एक मिनिटं वाट पाहा.
  • त्यानंतर पॉवर बटन आणि वॉल्यूम डाउन बटन सोबत दाबा.
  • फोन रिकव्हरी मोडमध्ये आल्यानंतर Factory Reset चा पर्याय निवडा.
  • आता सर्व डेटा क्लिअर करण्यासाठी Wipe Cache वर टॅप करा.
  • आता एक मिनिटं वाट पाहून फोनला ऑन करा.
  • आता तुम्ही पासवर्डशिवाय डिव्हाइसला अ‍ॅक्सेस करू शकता.
गुगल डिव्हाइस मॅनेजरचा वापर करून फोनला करा अनलॉक
  • डिव्हाइस मॅनेजवर जा.
  • आता गुगल अकाउंटने साइन इन करा.
  • त्यानंतर त्या फोनला निवडा, जो अनलॉक करायचा आहे.
  • आता लॉकचा पर्याय निवडा व नवीन पासवर्ड टाका.
  • त्यानंतर नवीन पासवर्डने तुम्ही डिव्हाइस अनलॉक करू शकता.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bv1ptC