नवी दिल्लीः लाँच होऊन फक्त एक दिवस झाला आहे. याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. पबजी न्यू स्टेटला गुगल प्ले स्टोरवरून अवघ्या एका दिवसात १ मिलियन डाउनलोड मिळाले आहेत. हे सर्व बग संबंधी रिपोर्ट आल्यानंतरचे आहे. ज्यात अनेक प्लेयर आपल्या खात्यात लॉग इन करू शकले नाहीत. तसेच काही ज्यांच्याकडे गेम बूटिंगची समस्या होती. गेम डेव्हलपर क्राफ्टन ने म्हटले की, त्यांच्याकडे अँड्रॉयड वर एक ऑप्शनल अपडेट आहे. ज्यात लोकांना गेम क्रॅश, बूटिंगची समस्या आदी काही मुद्द्यांवर लक्ष द्यावे लागणार आहे. अपडेट डिफॉल्ट ग्राफिक्स एपीआयला स्विच करतो. लाँच आधीच गेमचे गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवर ४० मिलियनहून जास्त प्री रजिस्ट्रेशन झाले होते. PUBG New State वर्ष २०५१ च्या ट्रोई नावाच्या काल्पनिक स्थानावर बनवला गेला आहे. गेम मध्ये काही फ्युचरिस्टिक वाहन जसे, वोल्टा फोर व्हीलर, वल्चर नावाची एक नवीन बाइक तसेच ट्रामचा समावेश आहे. जो बाहेरून हल्ल्याला आतून लोकांना आश्रय देण्यासाठी आहे. हा गेम जबरदस्त ग्राफिक्स सोबत क्लासिक पबजी मोबाइलचा व्हिज्युअल अपग्रेड सुद्धा आहे. जुन्या गेमचा लूक आणि फीलला कायम ठेवण्यात आले आहे. PUBG New State डाउनलोड लिंक तुम्ही तुमच्या अँड्रॉयड डिव्हाइस वर गुगल प्ले स्टोरवर जावू शकता. तसेच पबजी न्यू स्टेट खेळणे सुरू करू शकता. थेट प्ले स्टोरवर पेजवर जाण्यासाठी तुम्ही या लिंकवर सुद्धा क्लिक करू शकता. PUBG न्यू स्टेटला डाउनलोड करण्यासाठी अँड्रॉयड यूजर्सकडे कमीत कमी २ जीबी रॅम आणि अँड्रॉयड ६.० किंवा त्यापेक्षा जास्त वरच्या ओएसच्या फोनची आवश्यकता असेल. आयओएस यूजर्संसाठी कमीत कमी सिस्टम आवश्यकता आयओएस १३ किंवा त्यानंतर आयफोन किंवा आयपॅड आहे. या गेमला अँड्रॉयड व्हेरियंट १.४ जीबी आहे. तर आयओएस व्हेरियंट १.५ जीबीचे आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Fanjz9