Full Width(True/False)

Reliance Jio Plans: जिओ यूजर्सकडे शेवटची संधी, किंमती वाढण्याआधी रिचार्ज करून वाचवा ५०० रुपये; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी ने प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत व नवीन दर १ डिसेंबरपासून लागू होती. त्यामुळे जे यूजर्स १ डिसेंबरनंतर मोबाइल नंबर रिचार्ज करतील, त्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. मात्र, तुम्ही नवीन दर लागू होण्याआधीच रिचार्ज करून जवळपास ५०० रुपयांची बचत करू शकता. वाचा: ४८० रुपयांची बचत करण्यासाठी तुमच्याकडे केवळ आजचा दिवस आहे. आज रिचार्ज करून तुम्हाला जुन्या किंमतीतच डेटा-कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळेल व अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. अतिरिक्त पैसे खर्च करण्यापासून सुटका हवी असल्यास तुम्ही रिचार्ज करावा लागेल. जिओच्या वार्षिक प्लानची सुरुवाती किंमत सध्या २,३९९ रुपये आहे. १ डिसेंबरनंतर याच प्लानची किंमत वाढून २,८७९ रुपये होईल. म्हणजेच, तुम्हाला ४८० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. याचाच अर्थ तुम्ही आज (३० नोव्हेंबर) रिचार्ज केल्यास ३६५ दिवसांची वैधता मिळेल. यामुळे तुम्हाला वर्षभर रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही व अतिरिक्त खर्च देखील वाचेल. जर तुम्हाला वाटत असेल की नवीन रिचार्ज केल्यानंतर तुमचा सध्या सुरू असलेला प्लान समाप्त होईल, तर तसे नाहीये. तुमचा जुना प्लान समाप्त झाल्यानंतरच आधी रिचार्ज केलेला प्लान आपोआप सुरू होईल. रिलायन्स जिओच्या अधिकृत वेबसाइटवर देखील याबाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यावर एडवांस रिचार्जवर २० टक्के बचत होईल असे म्हटले आहे. सोबतच, सध्याच्या प्लानची वैधता समाप्त होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. Jio चा २,३९९ रुपयांचा प्लान जिओच्या २,३९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d09ZkX