Full Width(True/False)

Smartphone Launch: Redmi Note 11T 5G आज होणार भारतात लाँच, 'येथे' पाहा लाईव्ह स्ट्रिमिंग

नवी दिल्ली: Xiaomi चा नवीन स्मार्टफोन भारतात आज म्हणजेच ३० नोव्हेंबर रोजी एन्ट्री करणार आहे. या फोनच्या लॉंचिंग इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर केले जाईल. मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, आगामी Redmi Note 11T 5G स्मार्टफोनला ३३ W Pro फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी मिळेल. याशिवाय डिव्हाईसमध्ये ५० MP कॅमेरा ते ६ nm चिपसेट दिला जाऊ शकतो. वाचा: Redmi Note 11T 5G लाँच इव्हेन्ट : Redmi Note 11T 5G स्मार्टफोनचा लाँच इव्हेंट आज दुपारी १२ वाजता सुरू होईल. हा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर थेट पाहता येईल. Redmi Note 11T 5G तपशील (अपेक्षित): आतापर्यंत समोर आलेल्या टीझर्सनुसार, Redmi Note 11T 5G स्मार्टफोन ९० Hz रिफ्रेश रेटसह ६.६ -इंचाच्या डिस्प्लेसह येईल. यामध्ये ड्युअल-सिम आणि३३ W प्रो फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. तसेच, Redmi Note 11T 5Gला ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ८१० प्रोसेसर आणि ८ GB रॅम मिळेल. कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर, फोन मध्ये Dual रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात ५० MP प्राथमिक सेन्सर आणि ८ MP अल्ट्रा वाइड अँगल शूटर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १६ MP कॅमेरा मिळू शकतो. बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी : आगामी Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी दिली जाऊ शकते. यासोबतच फोनमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडिओ हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळू शकतात. Redmi Note 11T 5G ची किंमत (अपेक्षित) : लीक रिपोर्ट्सनुसार, Redmi Note 11T 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. त्याची सुरुवातीची किंमत सुमारे १४,००० रुपये असू शकते. मात्र, या फोनच्या खर्‍या किमतीची माहिती लाँच इव्हेंटनंतरच मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rklkoc