नवी दिल्लीः एअरटेल (Airtel) ने आपल्या प्रीपेड प्लान्सला महाग केले आहे. कंपनीच्या प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे आता यूजर्सला कंपनीचे रिचार्ज प्लान्ससाठी ५०१ रुपयापर्यंत जास्त खर्च करावे लागणार आहेत. अनलिमिटेड प्लान्समध्ये रिलायन्स जिओ यूजर्सला सर्वात कमी किंमतीत सर्वात जास्त डेटा आणि फ्री कॉलिंगचा प्लान ऑफर करीत आहे. जिओच्या या प्लानची किंमत ९८ रुपये आहे. प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट हे एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या सर्वात स्वस्त अनलिमिटेड प्लान्सपेक्षा जास्त चांगले आहेत. जिओचा ९८ रुपयाच्या प्लानमधील मिळणारे बेनिफिट जिओचा हा प्लान १४ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये कंपनी डेली १.५ जीबी डेटा या हिशोबा प्रमाणे एकूण २१ जीबी डेटा ऑफर करीत आहेत. प्लानमध्ये सब्सक्राइबर्सला अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट सुद्धा दिला जात आहे. काही यूजर्संना या प्लानमध्ये फ्री एसएमएस बेनिफिटची कमतरता जाणवू शकते. कंपनी या प्लानच्या सब्सक्राईबर्सला जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाते. वोडाफोन आयडियाचा ९९ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाचा हा अनलिमिटेड प्लान १८ दिवसाच्या वैधतेसोबत येतो. प्लानमध्ये कंपनी देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करीत आहे. इंटरनेट यूज करण्यासाठी प्लानमध्ये २०० एमबी डेटा दिला जातो. जिओकडून वोडाफोनच्या या प्लानमध्ये फ्री एसएमएस बेनिफिट ऑफर केला जात नाही. एअरटेलचा १९ रुपये आणि १२९ रुपयाचा प्लान अनलिमिटेड प्लान्सच्या यादीत एअरटेलच्या पोर्टफोलियोत १९ रुपये आणि १२९ रुपयाचा प्लान सर्वात स्वस्त प्लान आहे. १९ रुपयाच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि २०० एमबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता २ दिवसाची आहे. जर १२९ रुपयाचा प्लान हवा असेल तर कंपनी २४ दिवसाची वैधता सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि १ जीबी डेटा देत आहे. प्लानध्ये यूजर्संना अमेझॉन प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशनचे फ्री ट्रायल दिला जात आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nE6oir