नवी दिल्ली: आजकाल जवळ- जवळ सर्व स्मार्टफोन्स नॅनो सिम सपोर्टसह येतात. अनेक वेळा असेही दिसून आले आहे की, युजर्सनी सिमकार्ड टाकल्यानंतरही डिव्हाइसला सिम डिटेक्ट करता येत नाही. याचे कारण सिमकार्ड नीट ठेवण्यात आले नसणे किंवा यात सॉफ्टवेअरची समस्याही असू शकते. या परिस्थितीत, अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आम्ही तुम्हाला येथे काही टिप्स देणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सिम कार्डशी संबंधित समस्या स्वतःच दूर करू शकता. वाचा: स्मार्टफोन रीस्टार्ट करा: जर तुमच्या डिव्हाइसमध्ये सिम कार्ड काम करत नसेल, तर तुम्ही समस्येचे निराकरण करण्यासाठी तुमचा स्मार्टफोन करा. असे केल्याने तुमचे नवीन सिम सहज सिग्नल पकडेल. फोन रीस्टार्ट करण्यासाठी डिव्हाइसचे पॉवर बटण दाबा. यानंतर तुम्हाला रीस्टार्टचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यास तुमचे डिव्हाइस रीस्टार्ट होईल. सिम कार्ड क्लीन करा : कधी-कधी सिम कार्डच्या गोल्डन भागावर धूळ जमा झाल्यामुळे सिम डिव्हाइसला समर्थन देत नाही. अशा वेळी तुमचे सिम कार्ड स्वच्छ करा. याशिवाय, सिम कार्ड स्लॉटमध्ये चुकीच्या पद्धतीने सिम टाकल्यामुळे सिम काम करत नाही. त्यामुळे पूर्ण काळजी घेऊन सिमकार्ड सिम ट्रेमध्ये ठेवा. यामुळे सिम चांगले काम करेल. जर तुमचे सिम सिग्नल पकडत नसेल तर तुम्ही फ्लाइट किंवा एअरप्लेन मोड वापरू शकता. हा मोड काही काळ चालू ठेवा. त्यानंतर ते बंद करा. आता डिव्हाइस नेटवर्क शोधण्यास सुरुवात करेल आणि काही सेकंदात सिम कार्ड डिटेक्क्ट करेल नेटवर्क मॅन्युअली निवडा: सिम ठेवल्या नंतर तुमचा स्मार्टफोन आपोआप नेटवर्क शोधण्यात सक्षम नसेल, तर तुम्ही नेटवर्क मॅन्युअली निवडू शकता. नेटवर्क निवडण्यासाठी, फोनच्या सेटिंग्जवर जा आणि नेटवर्क आणि इंटरनेट विभागात जा. यानंतर तुम्हाला येथे नेटवर्क मॅन्युअली निवडण्याचा पर्याय मिळेल. येथून तुम्ही तुमचा नेटवर्क ऑपरेटर निवडा. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n8opW7