मुंबई- छोट्या पडद्यावर प्रचंड गाजणारा कार्यक्रम 'बिग बॉस' प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो. बिग बॉस म्हटलं की तो हिट जाणारचं. मात्र गेले दोन सीजन हे समीकरण थोडं बदलताना दिसतंय. 'बिग बॉस १३' हा सीजन प्रचंड गाजला होता. या सीजनमधील शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांचं नातं प्रेक्षकांना प्रचंड भावलं होतं. या सीजनने टीआरपीचे सगळे रेकॉर्ड तोडत. कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. मात्र त्यानंतर आलेले सीजन त्या उंचीच्या आसपासही पोहचू शकलेले नाहीत. प्रेक्षकांची मनं जिंकू शकलेले नाहीत. तोचतोचपणा पाहून कंटाळले प्रेक्षक सीजन १४ मध्ये जेव्हा टीआरपीमध्ये घसरण झाली होती तेव्हा निर्मात्यांनी मागील सीजनमधील सदस्यांना बोलावून कार्यक्रम सुरू ठेवला होता. मात्र या सीजनमध्ये यापैकी काहीही उपयोगी पडताना दिसत नाहीये. '' चे सुरुवातीचे दोन आठवडे प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर कार्यक्रमाच्या टीआरपीमध्ये घसरण पाहायला मिळतेय. निर्माते कार्यक्रमात पुन्हा जिवंतपणा आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्याचा उपयोग होत नाहीये. निर्मात्यांनी कार्यक्रमात वाइल्ड कार्ड सदस्य आणूनही टीआरपीमध्ये फरक पडलेला नाही. या सीजनमधील लव्ह स्टोरी पाहण्यातही प्रेक्षकांना फारसा रस उरलेला नाही. त्यात भर म्हणून बिग बॉसकडून देण्यात येणारे टास्कदेखील चांगले नसल्याने प्रेक्षक कार्यक्रमाला कंटाळले आहेत. कार्यक्रमासाठी झाला होता ५०० कोटी खर्च सीजन १५ साठी निर्मात्यांनी बराच पैसा खर्च केला आहे. कार्यक्रमाच्या सेटपासून, घरातील सदस्य आणि याची फी मिळून तब्बल ५०० कोटींची उलाढाल झाली आहे. आता कार्यक्रमाला अपेक्षित टीआरपी मिळत नसल्याने कार्यक्रम बंद करण्याची वेळ निर्मात्यांवर आली आहे. तसं झाल्यास निर्मात्यांना मोठं नुकसान होऊ शकतं. ५०० कोटी वसूल करण्यासाठी निर्माते जमेल तो प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qq0NhF