मुंबई- सध्या तिच्या '' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. पण कार्यक्रम संपल्यानंतर सारा गाडीत बसून घरी जाण्यासाठी बाहेर आली तेव्हा असे काही घडले की ती फारच चिडली. साराने यासाठी छायाचित्रकारांची माफीही मागितली. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया.. त्याचं झालं असं की, साराच्या गाडीला छायाचित्रकारांनी घेरलं होतं. सारा कारच्या दिशेने जात असताना एका सुरक्षा रक्षकाने छायाचित्रकारांना धक्काबुक्की केली. साराला हे कळताच तिला राग आला. तिने लगेच तिथे येऊन त्यांची माफी मागितली. तसेच सुरक्षा रक्षकालाही माफी मागण्यास सांगितले. साराने स्वतः माफी मागितली, नंतर सुरक्षा रक्षकालाही माफी मागायला लावली सारा अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सारा म्हणतेय, 'कुठेय तो आहे? तू कोणाला पाडलं? ज्यांना पाडलं ते निघून गेले. कृपया त्यांना सॉरी म्हणा. तुम्ही असे करू नका. तुम्ही कोणालाही धक्का देऊ शकत नाही.' यानंतर सारा सर्व छायाचित्रकारांना सॉरी म्हणते आणि गाडीत बसून निघून जाते. यूझर्स करत आहेत साराचं कौतुक साराच्या याच कृतीवर अनेकजण अभिनेत्रीचं भरभरून कौतुक करत आहेत. सहसा, अनेक स्टार्स छायाचित्रकारांना किंवा चाहत्यांना ढकलताना किंवा त्यांना बाजूला करताना दिसले आहेत. तिथेच साराकडून इतरांना दिली जाणारी वागणुक सर्वांचं मन जिंकत आहे. छायाचित्रकार असो की चाहते, सारा प्रत्येकाशी आत्मियतेने बोलताना दिसून येते. २४ डिसेंबरला रिलीज होणार 'अतरंगी' 'अतरंगी रे' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, आनंद एल राय दिग्दर्शित या सिनमात सारासोबत आणि अभिनेता हे दोन मेगास्टार्स आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने यापूर्वी आनंद यांच्यासोबत 'रांझना' सिनेमात काम केले होते. 'अतरंगी रे' २४ डिसेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xAGFuC