नवी दिल्लीः विवोने गुपचूपपणे चीनमध्ये विवो वाय ७४ एस (Vivo Y74s) 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशन विवो Y76s 5G सारखे आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला चीनमध्ये याला आणले गेले होते. फोनची चर्चा यासाठी होती कारण, या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 4,100mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत आणि धमाकेदार फीचर्स... Vivo Y74s 5G ची किंमत Vivo Y74s 5G ची किंमत २२९ युआन म्हणजेच २६ हजार ७९९ रुपये आहे. हे गॅलेक्सी ब्लू आणि स्टारी नाइट ब्लॅक रंगात येतो. कंपनीने सध्या याला चीनमधील बाजारात खरेदीसाठी उपलब्ध केले नाही. Vivo Y74s 5G चे स्पेसिफिकेशन्स Vivo Y74s 5G मध्ये ६.५८ इंचाचा आयपीएस एलसीडी पॅनेल आहे. जो फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन, २०.९ आस्पेक्ट रेशियो, 60Hz रिफ्रेश रेट आणि ९०.६१ टक्के स्क्रीन स्पेस देते. सुरक्षासाठी यात एक साइड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. हा फोन अँड्रॉयड ११ सोबत प्रीइन्स्टॉल्ड सोबत येतो. Vivo Y74s चा कॅमेरा Vivo Y74s मध्ये सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात ड्युअल व्ह्यू मोड, पोर्ट्रेट मोड, नाइट सीन मोड सारखे फीचर्स मिळतात. यात बॅक पॅनेल मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सचा समावेश आहे. हा नाइट सीन मोड, पोर्ट्रेट मोड, 1080p व्हिडिओ शूटिंग आणि स्लो मोश व्हिडिओ रेकॉर्डिंग सारखी सुविधा देते. Vivo Y74s 5G चे फीचर्स डायमेंशन ८१० चिपसेट या फोनमध्ये दिले आहे. हे एक सिंगल मॉडल मध्ये येते. ८ जीबी एलपीडीआर ४ एक्स रॅम, ४ जीबी व्हर्च्युअल रॅम आणि २५६ जीबी यूएफएस २.२ स्टोरेज देते. या फोनमध्ये 4,100mAh ची बॅटरी दिली आहे. ४४ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या डिव्हाइस मध्ये ड्युअल सीम, ५ जी ब्लूटूथ ५.१, जीपीएस, यूएसबी सी आणि ३.५ एमएम ऑडियो जॅक सारखे सामान्य कनेक्टिविटी फीचर सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nFyB8C