Full Width(True/False)

Vodafone Idea: सर्वात कमी किंमतीत 3GB डेटा, OTT मेंबरशिप, फ्री कॉलिंग आणि बरेच काही

नवी दिल्लीः भारतात सर्वात जास्त रिचार्ज प्लान ऑफर करणारी कंपनी वोडाफोन आयडिया लागोपाठ आपल्या ग्राहकांसाठी नवीन नवीन प्लान्स आणत आहे. TRAI च्या लेटेस्ट रिपोर्टनुसार, कंपनी 4G डेटा स्पीड देताना वोडाफोन आयडिया रिलायन्स जिओला जोरदार टक्कर देत आहे. ने आपली डाउनलोड आणि अपलोड स्पीड मध्ये खूपच सुधारणा केली आहे. टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास ऑफर आणि खास प्लान देत आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी वोडाफोन आयडियाच्या ३ जीबी डेली डेटा प्लान संबंधी माहिती देत आहोत, ज्यात ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. Vodafone Idea चा ३ जीबी डेटाचा प्लान वोडाफोन आयडियाचा ५०१ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त अनलिमिटेड प्लान असून यात ३ जीबी डेटा दिला जातो. याची किंमत ५०१ रुपयाची आहे. या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. हा अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस सोबत येतो. ग्राहकांना मूव्हीज आणि टीव्ही आणि अन्य काही अॅप्लिकेशन सोबत ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारचे १ वर्षासाठी अॅक्सेस सुद्धा मिळतो. वोडाफोन आयडियाचा ७०१ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाचा दुसरा प्लान असून यात ३ जीबी डेली डेटा सोबत येतो. हा प्लान ७०१ रुपयाचा आहे. या प्लानची सर्विस वैधता ५६ दिवसाची आहे. सोबत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळते. या प्लान सोबत ग्राहकांना मूव्ही आणि टीव्ही सोबत ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारचे १ वर्षाचे अॅक्सेस मिळते. या प्लानमध्ये बिंज ऑल नाइट ऑफर देते. यूजर्संना यात रात्री १२ पासून सकाळी ६ पर्यंत इंटरनेट वर स्ट्रीम करू शकते. यासोबतच ग्राहकांना विकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते. वोडाफोन आयडियाचा ९०१ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाचा ९०१ रुपयाच्या किंमतीचा प्लान असून यात एका दिवसात ३ जीबी डेटा देते. या प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. अन्य प्लान्स प्रमाणे अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळते. रिलायन्स जिओ ९९९ रुपयाचा यासारखाच प्लान देते. हा प्लान अन्य प्लान्स मध्ये वोडाफोन आणि टीव्ही सोबत ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारचे १ वर्षाचे सब्सक्रिप्शन देते. या प्लान सोबत यूजर्संना बिंज ऑल नाइट ऑफर पर्यंत मिळवता येते. यूजर्संना यात रात्री १२ पासून सकाळी ६ पर्यंत इंटरनेट वर स्ट्रीम करू शकते. यासोबतच ग्राहकांना विकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kPKx5X