Full Width(True/False)

Vodafone-Idea: एअरटेलनंतर आता Vi ग्राहकांना झटका, २७ कोटी यूजर्ससाठी मोठी बातमी, प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ

नवी दिल्लीः एअरटेल नंतर आता वोडाफोन आयडिया (Vi) ने आपल्या प्रीपेड प्लान्सला महाग केले आहे. वोडाफोनच्या प्रीपेड प्लान्सच्या वाढलेल्या किंमती २५ नोव्हेंबर पासून लागू होणार आहेत. कंपनीने आपल्या प्रीपेड प्लान्सला ५०० रुपयांपर्यंत महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेल प्रमाणे वोडाफोन सुद्धा प्रति यूजर आपले सरासरी रिव्हेन्यू वाढण्याचा प्रयत्न करीत आहे. किंमतीत वाढ करण्यात आल्यानंतर प्लानची किंमत एअरटेल प्रमाणे ७९ रुपयांऐवजी आता ९९ रुपये झाली आहे. ७९ रुपयाचा प्लान आता ९९ रुपयांना कंपनीने आपल्या ७९ रुपयाचा बेस प्लानला महाग केले आहे. आता याची किंमत ९९ रुपये झाली आहे. प्लानमध्ये २८ दिवसाची वैधता सोबत ९९ रुपयाचा टॉकटाइम आणि २०० एमबी डेटा दिला जात आहे. प्लान मध्ये कॉलिंग चार्ज १ पैसे प्रति सेकंद आहे. २१९ रुपयाचा प्लान आता २६९ रुपयांना कंपनीचा हा पॉप्युलर प्लान ५० रुपयांनी महाग करण्यात आाल आहे. २८ दिवसाची वैधता सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० फ्री एसएमएस आणि डेली १ जीबी डेटा मिळेल. २९९ रुपयाचा प्लान झाला आता ३५९ रुपयांना २९९ रुपयाचा प्लान आता ६० रुपयांना झाला आहे. प्लानमध्ये कंपनी डेली २ जीबी डेटा ऑफर करते. २८ दिवसाची वैधता सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. ४४९ रुपयाचा प्लान आता ५३९ रुपयांना कंपनीच्या या प्लानमध्ये ९० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या प्लानमध्ये कंपनी यूजर्संना रोज २ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएस ऑफर करीत आहे. यूजर्संना देशात कोणत्याही नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग करता येवू शकते. ५९९ रुपयाचा प्लान झाला ७१९ रुपयांना ८४ दिवसाची वैधता असलेला प्लान कंपनीचा सर्वात पॉप्युलर प्लान्सपैकी एक आहे. प्लानमध्ये कंपनी रोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, आणि रोज १०० एसएमएस ऑफर करते. २३९९ रुपयाचा प्लान झाला २८९९ रुपयांना कंपनीचा हा प्लान ५०० रुपयांनी महाग झाला आहे. ३६५ दिवसाची वैधता असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली १०० फ्री एसएमएस दिले जाते. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा ऑफर केले जाते. डेटा टॉप अप प्लान्स सुद्धा झाले महाग वोडाफोन आयडिया ने टॅरिफ्ड व्हाइस प्लान्स आणि अनलिमिटेड प्लान्स सोबत डेटा टॉप प्लान्सला सुद्धा महाग करण्यात आले आहे. कंपनीच्या डेटा टॉप अप प्लान्सची सुरुवात आता ५८ रुपयांपासून सुरू होणार आहे. आधी याची किंमत ४८ रुपये होती. टॉप अप प्लान्सच्या किंमतीत १० रुपये ते ६७ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l2PrMT