नवी दिल्ली : देशात निवडणुका सुरू होणार असून पारदर्शक लोकशाही राखण्यासाठी निवडणुकांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे निवडणुकांना लोकशाहीचा सणही म्हटले जाते. मात्र, निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपल्याकडे वैध मतदार ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय कुणीही मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही. दुसरीकडे निवडणुकीव्यतिरिक्त अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही मतदार ओळखपत्राचा वापर केला जातो. वाचा: अशात अनेकदा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतो. जर तुम्ही अलिकडच्या काळात तुमचा पत्ता बदलला असेल, तर तुम्ही ताबडतोब मतदार ओळखपत्रामध्ये तुमचा पत्ता अपडेट करून घेणे आवश्यक आहे . तुम्हाला जर या प्रक्रियेबद्दल माहित नसेल तर काळजीचे कारण नाही. आज आम्ही काह टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही मतदार ओळखपत्रातील पत्ता बदलू शकता. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. हे तुम्ही घरी बसून सहज करू शकता. मतदार ओळखपत्रावरील पत्ता अपडेट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा :
- यासाठी, प्रथम तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल www.nvsp.in च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
- नंतर तुम्हाला नवीन मतदाराच्या नोंदणीसाठी/ transfer from AC to AC साठी ऑनलाइन अर्जाचा फॉर्म ६ निवडावा लागेल.
- जर तुम्ही एकाच मतदारसंघात तुमचा पत्ता बदलला असेल, तर फॉर्म ८ चा पर्याय निवडा.
- ही प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, राज्य, मतदारसंघ, वर्तमान कायमचा पत्ता आणि इतर आवश्यक तपशील प्रविष्ट करावे लागतील.
- पुढील टप्प्यात छायाचित्र, पत्त्याचा पुरावा, वय इत्यादीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करावी लागतील.
- त्यानंतर अपलोड केलेल्या कागदपत्रांसह फॉर्म ऑनलाइन सबमिट करावा लागेल. पुढे जाऊन घोषणा भरा आणि कॅप्चा कोड भरा.
- सबमिट करण्यापूर्वी, तुमचे सर्व तपशील काळजीपूर्वक वाचा. फॉर्म काळजीपूर्वक वाचल्यानंतर, तो सबमिट करा.
- काही वेळाने फॉर्मची पडताळणी केल्यानंतर तुमच्या मतदार ओळखपत्राचा नवीन पत्ता अपडेट केला जाईल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CIDj9Q