नवी दिल्ली: तुम्हाला वरील डिलीट केलेले मेसेज रिकव्हर करायचे असतील तर यात आम्ही तुम्हाला मदत करू. व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मवर सध्यातरी असे कोणतेही फीचर नाही, जे व्हॉट्सअॅपचे डिलीट केलेले मेसेज रिकव्हर करू शकेल. पण आम्ही तुम्हाला या बातमीत एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याला फॉलो करून तुम्ही कोणताही डिलीट केलेला WhatsApp मेसेज सहज वाचू शकता. वाचा: व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज वाचण्याचा हा सोपा मार्ग : डिलीट केलेले मेसेज रिकव्हर करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनवर Notisave अॅप डाउनलोड करा. अॅप डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करा आणि व्हॉट्सअॅपच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या फोनवर अॅपची होम स्क्रीन दिसेल. येथे तुम्हाला व्हॉट्सअॅपचे डिलीट झालेले मेसेज दिसतील. केवळ मेसेजच नाही. तर या अॅपमध्ये तुम्हाला डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओही मिळतील. युजर्सच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी व्हॉट्सअॅप एका नवीन अपडेटवर काम करत आहे. या नवीन अपडेटच्या आगमनानंतर, व्हॉट्सअॅप युजर्स त्यांचे last seen लपवू शकतील. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. हे फीचर लवकरच सर्व युजर्ससाठी रिलीझ होईल अशी अपेक्षा आहे. ऑगस्टमध्ये लाँच करण्यात आले होते हे फीचर: व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्सच्या सोयीसाठी ऑगस्टमध्ये View once नावाचे एक खास फीचर लाँच केले होते. या फीचर अंतर्गत पाठवलेला मेसेज यूजरने पाहिल्यानंतर आपोआप डिलीट होतो. तसेच, व्हॉट्सअॅपचे व्ह्यू वन्स वैशिष्ट्य युजर्सना स्क्रीनशॉट घेण्यापासून प्रतिबंधित करणार नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nbQc87