नवी दिल्लीः whatsapp मेटाचा इंस्टेंट मेसेजिंग अॅप सध्या चर्चेत आहे. कारण, एक नवीन अपडेट घेवून येत आहे. ज्याचे नाव रिअॅक्शन नोटिफिकेशन फीचर असे आहे. हे नवीन अपडेट गुगल प्ले स्टोर बीटा प्रोग्रामद्वारे उपलब्ध होणार आहे. या नवीन फीचरला मिळवण्यासाठी तुमच्याकडे व्हाट्सअॅप अँड्रॉयड बीटा व्हर्जन 2.21.24.8 असायला हवे. बीटा टीझर असूनही जर तुम्हाला हे फीचर मिळत नसेल तर तुम्ही याला एपीके मिरर वरून मिळवू शकता. व्हाट्सअॅप बीटा मध्ये मिळेल रिअॅक्शन नोटिफिकेशन रिपोर्ट मध्ये पहिल्यांदा हे समोर आले होते. व्हाट्सअॅप मेसेज रिअॅक्शन नावाचे एक नवीन फीचर तयार करण्यात येत आहे. सोबत त्यांनी या फीचरला चुकीच्या पद्धतीने इनेबल केले होते. तसेच त्यानंतर तात्काळ हटवले आहे. आता, हे फीचर व्हाट्सअॅप बीटा मध्ये अँड्रॉयड व्हर्जन 2.21.22.7 अपडेट साठी पाहिले गेले आहे. हे फीचर बीटा व्हर्जनसाठी उपलब्ध आहे. याची टेस्टिंग तुम्ही करू शकता. जरी हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध नसले तरी. याआधी आयओएस साठी व्हाट्सअॅप रिअॅक्शन नोटिफिकेशनला मॅनेज करण्याच्या पद्धतीवर काम करीत होते. WABetaInfo चा दावा आहे की, आता असे वाटत आहे की, कंपनी या फीचरला अँड्रॉयड वर आणण्याची योजना बनवत आहे. कारण, हे बीटा वर फीचरची टेस्टिंग करीत आहे. भविष्यात अपडेट द्वारे याला रोलआउट केले जावू शकते. रिपोर्टनमधून एक स्क्रीनशॉट शेयर केले आहे. ज्यात दाखवले आहे की, मेसेजवर रिअॅक्शन करण्याचा फीचर भविष्यात अपडेटच्या माध्यमातून उपलब्ध होईल. याशिवाय, तुम्ही ग्रुप आणि पर्सनल चॅट दोन्ही साठी रिअॅक्शन नोटिफिकेशनला मॅनेज करू शकता. परंतु, यासंबंधी कोणताही शब्द नाही की, वास्तविक या फीचरला यूजर्संसाठी कधी सुरू करणार आहे. व्हाट्सअॅप मध्ये येताहेत हे मस्त फीचर रिअॅक्शन नोटिफिकेशन फीचर शिवाय, व्हाट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी अनेक खास फीचर आणण्याची तयारी करीत आहे. फेसबुवर जाहिरात ऑप्शन असेल, जो व्हाट्सअॅप बिजनेसच्या यूजर्संना मदत करणार आहे. याशिवाय, आयओएस यूजर्स लवकरच माय कॉन्टॅक्ट अॅक्सेप्ट फीचर सोबत एक खास प्रायव्हसी ऑप्शन मिळवण्यात सक्षम असेल. जो यूजर्संना आपल्या अखेरच्या पाहिलेल्या प्रोफाइल फोटो आणि संपर्क याला निवडण्याची माहिती संबंधी लपवता येईल. व्हाट्सअॅपचे बीटा व्हर्जन यूजर्संना आयकॉन, इमोजी आणि एक कस्टम बॅकग्राउंडचा उपयोग करून कस्टमाइज्ड ग्रुप आयकॉन बनण्यास मदत करेल. याला 2.21.20.2 अॅपच्या अँड्रॉयड बीटा व्हर्जनवर रोल आउट केले जावू शकते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x82MZ6