Full Width(True/False)

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कमालचे फीचर, आता ठराविक लोकांनाच दिसणार तुमचा प्रोफाइल फोटो

नवी दिल्ली : यूजर्सचा चॅटिंग अनुभव अधिक शानदार बनविण्यासाठी नवनवीन फीचर्स जारी करत असते. या महिन्याच्या सुरुवातीला WhatsApp ने एक नवीन प्रायव्हसी फीचर जारी केले होते. या फीचरद्वारे यूजर्सला अधिक कंट्रोल मिळतो. वाचा: फेसबुकच्या मालकीच्या WhatsApp ने My Contacts Except हे फीचर जारी केले आहे. रिपोर्टनुसार, या फीचरला आतापर्यंत केवळ अँड्राइट बीटा व्हर्जनसाठी जारी करण्यात आले होते. आता कंपनी इतर यूजर्ससाठी देखील फीचर जारी करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, अ‍ॅपचे अपडेटेड व्हर्जन २.२१४६.५ सह हे फीचर वेब आणि डेस्कटॉप यूजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp च्या या फीचरने यूजर्सला त्यांचे लास्ट सीन, स्टेट्स, आणि अबाउट डिस्क्रिप्शन कोण पाहू शकते, हे ठरवता येईल. हे फीचर प्रायव्हसी सेटिंगमध्ये मिळेल. WhatsApp मध्ये सध्या Everyone, My Contacts आणि Nobody हे पर्याय मिळतात. या फीचरद्वारे यूजर्स लास्ट सीन, स्टेट्स, प्रोफाइल फोटो आणि अबाउट डिस्क्रिप्शन कोणाला दिसेल व कोणाला नाही, हे ठरवू शकतील. तसेच, यूजर्सला ते कॉन्टॅक्ट देखील निवडता येतील, ज्यांना प्रोफाइल फोटो दाखवायचा नाहीये. यामुळे यूजर्सला प्रायव्हसीसंदर्भात अधिक नियंत्रण मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kTKZ32