Full Width(True/False)

आता थेट WhatsApp वर उपलब्ध होईल कोविड वॅक्सिनेशन सर्टिफिकेट, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : देशात अभियान वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने १०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा ओलांडला आहे. अनेक ठिकाणी प्रवेशासाठी लसीचे सर्टिफिकेट आवश्यक आहे. तुम्ही जर लसीचे दोन डोस घेतले असतील व तरीही सर्टिफिकेट मिळत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. तुम्हाला आता थेट च्या माध्यमातून कोविड वॅक्सिनेशन सर्टिफिकेट मिळेल. वाचा: तुम्ही कोविन आणि अ‍ॅपशिवाय देखील वॅक्सिनेशन सर्टिफिकेट सहज डाउनलोड करू शकता. WhatsApp च्या माध्यमातून सर्टिफिकेट कसे डाउनलोड कराल याविषयी जाणून घेऊया. WhatsApp च्या माध्यमातून असा डाउनलोड करा कोविड वॅक्सिनेशन सर्टिफिकेट
  • तुम्ही लस घेताना जो नंबर नोंदवला असेल, त्यावरून ९०१३१५१५१५ या नंबरवर WhatsApp वरून HI लिहून पाठवा.
  • हा मोबाइल नंबर काही दिवसांपूर्वीच भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केला आहे.
  • HI लिहून पाठवल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की, हे सरकारचे करोना हेल्पडेस्क आहे.
  • त्यानंतर तुम्हाला लिहून पाठवावे लागेल.
  • आता तुमच्या फोनवर एक ओटीपी येईल, तो तुम्हाला WhatsApp मेसेजद्वारे पाठवायचा आहे.
  • आता तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोडचा पर्याय मिळेल.
  • यात तुम्हाला १ टाइप करून सेंड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला डाउनलोडसाठी पीडीएफ फॉर्मेटमध्ये सर्टिफिकेट मिळेल.
आरोग्य सेतू व WhatsApp व्यतिरिक्त तुम्ही आरोग्य सेतू आणि कोविन अ‍ॅपच्या माध्यमातून देखील वॅक्सिनेशन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. या दोन्ही अ‍ॅपवर जाऊन तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bQQwCJ