Full Width(True/False)

या इंडियन अॅपने प्रसिद्धीत फेसबुकसारख्या दिग्गज कंपन्यांना टाकले मागे, बनवला हा नवीन रेकॉर्ड

नवी दिल्लीः दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook आणि Messenger ला एका भारतीय अॅपने पॉप्युलिरिटीत मागे टाकले आहे. हो, ही किमया अॅपने केली आहे. Meesho अॅपला गेल्या ऑक्टोबर महिन्यात भारतात फेसबुक पेक्षा जास्त डाउनलोड करण्यात आले आहेत. सेन्सर टॉवरच्या एका रिपोर्टच्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात Meesho ला २५ मिलियन म्हणजेच २.५ कोटी हून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. Meesho अॅप Google Play Store सोबत Apple App Store वर खूप मोठ्या संख्येत डाउनलोड्स मिळाले आहेत. मिशोने गेल्यावर्षीच्या तुलनेत ७५० टक्के वाढ मिळवली आहे. काय आहे Meesho अॅप Meesho एक इंडियन सोशल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणाहून लेटेस्ट डिझाइन आणि ट्रेंडच्या कपड्याची शॉपिंग केली जावू शकते. याचे मुख्यालय बेंगळुरू मध्ये आहे. याला आयआयटी दिल्लीच्या पदवीधारक विदित आत्रे आणि संजीव बननवाल यांनी डिसेंबर २०१५ मध्ये सुरू केले होते. त्यांनी आपले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म WhatsApp, Facebook आणि Instagram सारखा प्लॅटफॉर्म सुरू केले होते. याने आता पॉप्युलिरिटी मध्ये फेसबुकला मागे टाकले आहे. हे पहिले भारतीय अॅप आहे. ज्यात फेसबुककडून गुंतवणूक करण्यात आली आहे. जगातील टॉप ५ अॅप जर सर्वसाधारणपणे अॅप डाउनलोडिंगचा विचार केला तर टिकटॉक जगातील सर्वात जास्त डाउनलोड केले जाणारे अॅप आहे. तर टिकटॉकचा वापरावर भारतात बंदी आहे. TikTok - ५.७ कोटी डाउनलोड Instagram - ५.६ कोटी डाउनलोड Telegram - ३ कोटी डाउनलोड WhatsApp - २.७ कोटी डाउनलोड Snapchat - २.६ कोटी डाउनलोड Meesho - २.५ कोटी डाउनलोड Facebook - २.३ कोटी डाउनलोड App Store चे टॉप डाउलोडिंग अॅप Tiktok Youtube National Anti Fraud Center WhatsApp Instagram Facebook Capcut Google Map Taobao WeChat Google Play Store चे टॉप डाउनलोडिंग अॅप Instagram Facebook Tiktok Telegram WhatsApp Snapchat meesho Messenger spotify Playit वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YspvSQ