नवी दिल्ली : च्या ६४ मेगापिक्सल कॅमेरा सेटअप आणि दमदार प्रोसेसरसह येणाऱ्या स्मार्टफोनला बंपर डिस्काउंटसह खरेदीची संधी आहे. फोनवर थेट डिस्काउंटचा लाभ मिळत नसला तरी इतर आकर्षक आहेत. या फोनला तुम्ही १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. वाचा: Xiaomi 11 Lite 5G NE चे स्पेसिफिकेशन्स डिस्प्ले: स्मार्टफोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा ६.५५ इंच फुल एचडी+ (१०८०x२४०० पिक्सल) ओलेड डिस्प्ले दिला असून, सोबतच डॉल्बी व्हिजन सपोर्ट, एचडीआर १० प्लस आणि २४० हर्ट्ज टच सँपलिंग रेट मिळतो. प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: Xiaomi 11 Lite 5G NE मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी चिपसेटसह ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. सॉफ्टवेअर : ड्यूल सिम (नॅनो) सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड ११ आधारित एमयूआय १२.५ वर काम करतो. कॅमेरा: बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सल, ८ मेगापिक्सल वाइड अँगल कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल टेली मॅक्रो कॅमेरा मिळतो. तर सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. बॅटरी: फोनमध्ये ४२५० एमएएच बॅटरी दिली असून, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. सिक्योरिटीसाठी साइडला फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. Xiaomi 11 Lite NE 5G ची किंमत फोनच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २६,९९९ रुपये, तर ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २८,९९९ रुपये आहे. ऑफर फोनला आयसीआयसीआय बँक डेबिट/क्रेडिट कार्ड्स आणि ईएमआयवर खरेदी केल्यास २,५०० रुपयांपर्यंत सूट मिळते. तसेच, जुन्या फोनवर १७,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळतो. फोनवर एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास ६ जीबी रॅम व्हेरिएंटला फक्त ९,०९९ रुपयात खरेदी करता येईल. मात्र, एक्सचेंज ऑफर फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YDDKV0