Full Width(True/False)

4G Plans: हे आहेत स्वस्तात मस्त 4G प्लान्स, १५ रुपयांमध्ये मिळतोय १ GB डेटा, पाहा तुमच्यासाठी बेस्ट कोणता

नवी दिल्ली : सर्व टेलिकॉम कंपन्यांचे प्री-पेड प्लान आता जवळपास २५ टक्क्यांनी महाग झाले आहेत. सध्या काही स्वस्त प्लान्स उपलब्ध असूनही ग्राहकांना रिचार्ज करण्यात अडचणी येत आहेत. कारण, बहुतेक लोकांना या प्लानबद्दल पूर्णपणे माहिती नाही. जाणून घ्या Airtel, Vi, Jio आणि BSNL च्या स्वस्त 4G प्लानबद्दल ज्यात तुम्हाला जबरदस्त Data बेनिफिट्स मिळतील. वाचा: Airtel चा सर्वात स्वस्त 4G डेटा प्लान: एअरटेलचा ५८ रुपयांचा डेटा प्लान आहे ज्यामध्ये एकूण ३ जीबी डेटा उपलब्ध आहे. या डेटा Plan ची वैधता existing plan च्या वैधतेनुसार असते. १ GB डेटाची किंमत १९ .३३ रुपये आहे. आधी नमूद केल्याप्रमाणे हा एक डेटा प्लान आहे, त्यामुळे तुम्हाला या प्लान कोणतीही कॉलिंग किंवा मेसेजिंग सुविधा मिळणार नाही. Vodafone Idea चा सर्वात स्वस्त 4G डेटा प्लान: Vodafone Idea चा १९ रुपयांचा डेटा प्लान आहे ज्यामध्ये १ GB डेटा उपलब्ध आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त डेटा प्लान आहे. या प्लानची वैधता १ दिवस आहे. यामध्ये तुम्हाला इतर कोणतीही सुविधा मिळणार नाही. BSNL चा सर्वात स्वस्त 4G डेटा प्लान: BSNL चा सर्वात स्वस्त 4G डेटा प्लान १६ रुपयांचा आहे. यामध्ये एकूण २ जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लानची वैधता १ दिवस आहे. सरासरी, BSNL च्या १ GB 4G डेटा प्लानची किंमत ८ रुपये आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे कंपनीची 4G सेवा सध्या फक्त काही मंडळांमध्ये आहे. Jio चा सर्वात स्वस्त 4G डेटा प्लान: जिओच्या सर्वात स्वस्त 4G डेटा प्लानची किंमत १५ रुपये आहे. यात १ जीबी डेटा मिळेल. या प्लानची चांगली गोष्ट म्हणजे डेटा प्लानची वैधता existing plan च्या वैधते इतकीच आहे. यामध्ये डेटाशिवाय कॉलिंग किंवा मेसेजिंग सारखी कोणतीही सुविधा मिळणार नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EqosBL