Full Width(True/False)

Aadhar Card Update: तुमच्या मुलांचे आधार कार्ड बनविण्याआधी जाणून घ्या हे अपडेट्स

नवी दिल्ली: लहान मुलांच्या ला बाल आधार कार्ड म्हणतात आणि त्याचा रंग निळा असतो. ५ वर्षांखालील मुलांसाठी आधार कार्ड बनवले जाते, मात्र आता नवीन नियमानुसार, मुलांचे कार्ड बनवण्यासाठी बायोमेट्रिकची गरज भासणार नाही. पाच वर्षांखालील मुलांसाठी फिंगर प्रिंट आणि डोळे स्कॅन केले जाणार नाही, परंतु जर ते पाच वर्षांपेक्षा जास्त असतील तेव्हा करणे अनिवार्य असेल. तुम्हालाही तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवायचे असेल तर नियम जाणून घ्या. पाहा नवीन नियमात काय अपडेट आहे. वाचा: आधार कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदार आयडी, चालक परवाना ,नरेगा जॉब कार्ड, पत्त्याचा पुरावा, बँक पासबुक, पोस्ट ऑफिस अकाउंट पास बुक, रेशन कार्ड. मुलांचे आधार कार्ड कसे बनवायचे ? सर्वप्रथम तुम्हाला च्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. आता आधार कार्ड नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा. आता विचारलेली माहिती जसे की मुलाचे तपशील आणि इतर बायोमेट्रिक माहिती, पत्ता, जिल्हा, राज्य इत्यादी माहिती भरा. आधार कार्ड नोंदणीसाठी अपॉइंटमेंट या पर्यायावर क्लिक करा. तुमचे जवळचे आधार केंद्र निवडा, तुमची अपॉइंटमेंट निवडा आणि वेळेवर तेथे जा. आधार नोंदणी केंद्रावरच केली जाईल. ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, नातेसंबंधाचा पुरावा आणि जन्मतारीख पुरावा यासारखी आवश्यक कागदपत्रे केंद्रावर सोबत ठेवा. केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याकडून तुमची प्रमाणपत्रे तपासा. जर मुलाचे वय ५ वर्षांपेक्षा कमी असेल, तर फक्त रहिवासी आणि चेहर्यावरील ओळखीचा पुरावा पुरेसा आहे. या पूर्ण प्रक्रियेनंतर, तुम्हाला एक नंबर दिला जाईल ज्यावरून तुम्ही आधार कार्ड ट्रॅक करू शकता. ६० दिवसांनंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल आणि ९० दिवसांनंतर तुम्हाला आधार कार्ड मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dnyGI3