मुंबई: सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा मौसम सुरू आहे. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक जोड्या येत्या महिन्यांमध्ये बोहल्यावर चढणार असल्याची सध्या सुरू आहे. अभिनेत्री आणि तिचा प्रियकर ही जोडीही लवकर लग्न करणार आहे. हे दोघं डेस्टिनेशन वेडिंग करणार नसून मुंबईतच लग्न करणार आहेत. लग्नासाठी मुंबईच्या बाहेर जाण्याची या दोघांची अजिबात इच्छा नाही. त्यामुळं हे दोघं जण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. विशेष म्हणजे लग्नाची पत्रिकाही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तर काही व्हीआयपी पाहुण्यांना अंकिता आणि विकी यांनी स्वत: पत्रिका दिल्या आहेत. महाराष्ट्राचे भगतसिंह कोश्यारी यांनाही अंकितानं आणि विकी यांनी लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. अंकिता आणि विकी यांनी राजभवन इथं राज्यपाल यांची भेट घेतली आणि लग्नाची पत्रिका दिली. यानंतर अंकितानं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रॉयल ब्ल्यू रंगाच्या लग्नपत्रिकेवर आमंत्रित व्यक्तीचे नाव लिहिले आहे. ही पत्रिका उघडल्यावर आतमध्ये सोनेरी अक्षरामध्ये वधू-वरांची नावे लिहिली आहेत. त्याशिवाय कार्डामध्ये काही मंत्र लिहिले आहे. मात्र या पत्रिकेमध्ये या दोघांचे लग्न कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला होणार आहे याचा उल्लेखच केलेला नाही. तिथे केवळ डिसेंबर २०२१ इतकेच नमूद केले आहे.. विकी आणि अंकिताच्या लग्नाआधी काही धार्मिक विधी झाले. हे विधी महाराष्ट्रीयन पद्धीने झाले. त्या विधींचे फोटो अंकिता आणि विकीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिता आणि विकीने कपाळावर मोत्यांच्या मुंडावळ्या बांधल्या आहेत. तर अंकिताने हातामध्ये हिरवा चुडा भरला असून हिरव्या रंगाची साडी तिने नेसली आहे. तर विकीनेही क्रीम कलरचा कुर्ता पायजमा घातला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lYzUyr