Full Width(True/False)

Amazon: स्वस्तात Amazon Prime मेंबरशिप घेण्याची आज शेवटची संधी, उद्यापासून द्यावे लागतील ५०० रुपये जास्त

नवी दिल्ली : एकीकडे महागाईमुळे नागरिक वैतागले असताना रिचार्ज प्लान्स, ओटीटी सबस्क्रिप्शन देखील महाग झाले आहे. आता मेंबरशिप घेणे महाग होणार आहे. १४ डिसेंबरपासून प्राइम मेंबरशिपची किंमत वाढवणार आहे. ही किंमत ५० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. याबाबतची माहिती ने ऑक्टोबरमध्येच दिली होती. वाचा: Amazon Prime च्या वर्षभराच्या मेंबरशिप प्लानची किंमत ९९९ रुपयांऐवजी १,४९९ रुपये होणार आहे. १४ डिसेंबरपासून हे नवीन दर लागू होतील. त्यामुळे तुम्हाला जर ५०० रुपयांची बचत करायची असल्यास आजच मेंबरशिप घ्यावी लागेल. कंपनीने म्हटले आहे की, अद्याप जुन्या किंमतीत सबस्क्रिप्शन घेता येईल. Amazon Prime मेंबरशिपचा मासिक प्लान १२९ रुपयांपासून सुरू होतो. आता ही किंमत वाढवून १७९ रुपये झाली आहे. तर तीन महिन्यांच्या प्लानसाठी ४५९ रुपये खर्च करावे लागतील. Amazon ने किंमतीतील बदल सपोर्ट पेजवर कन्फर्म केला आहे. किंमतीत वाढ झाल्याचा परिणाम सध्याच्या प्राइम मेंबर्सवर होणार नाही. मात्र, प्राइम मेंबरशिप समाप्त झाल्यानंतर पुन्हा मेंबरशिपसाठी अधिक पैसे द्यावे लागतील. दरम्यान, Disney+ Hotstar ने देखील नवीन प्लान्स सादर केले होते. याचा परिणाम प्रीपेड प्लान्सवर देखील झाला आहे. कंपनीने ३९९ रुपयांचा प्लान बंद केला असून, आता नवीन प्लान्सची सुरुवाती किंमत ४९९ रुपये आहे. तर नेटफ्लिक्सच्या बेसिक मेंबरशिपची किंमत २०० रुपयांपासून सुरू होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DN04Kn