Full Width(True/False)

हरनाज संधू झाली मिस यूनिवर्स, ८० देशांतील मुलींना दिली मात

नवी दिल्ली- हरनाज संधूने ८० देशांतील मुलींना हरवून स्पर्धा जिंकली आहे. चंदीगडची मॉडेल आणि अभिनेत्री हिने ७० व्या मिस युनिव्हर्समध्ये 2021 चा मुकुट पटकावला आहे. अशाप्रकारे, सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर ती मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी तिसरी भारतीय आहे. याआधी १९९४ मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून देशाचं नाव उंचावलं होतं. यानंतर लारा दत्ताने २००० मध्ये ही स्पर्धा जिंकली आणि अनेक सुंदर मॉडेलना हरवून मिस युनिव्हर्सचा किताब भारतात आणला होता. आता २०२१ मध्ये देशातील ८० स्पर्धकांना पराभूत करून हा विजय मिळवणाऱ्या हरनाज संधूने देशाची शान वाढवली आहे. हा खिताब जिंकण्यापूर्वी हरनाज मिस इंडिया २०१९ चा देखील भाग होती आणि ती टॉप १२ मध्ये होती. हरनाजने याच वर्षी म्हणजे २०१९ मध्ये मिस इंडिया पंजाबचा किताबही जिंकला होता. याशिवाय ती मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ स्पर्धाही जिंकली आहे. क्रिती सॅननने तिला हा पुरस्कार दिला होता. हरनाजकडे 'बाई जी कुटंगे', 'यारा दियां पौ बरन' यासह अनेक पंजाबी सिनेमे आहेत, जे पुढील वर्षी रिलीज होणार आहेत. हरनाज संधू निसर्गप्रेमी आहे. हरनाजने ग्लोबल वॉर्मिंग आणि निसर्गाच्या संवर्धनाविषयीच्या तिच्या विचारांनी मिस दिवाच्या जज पॅनलची मनं जिंकली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rXzprV