Full Width(True/False)

Apple: सुवर्णसंधी! खूपच स्वस्तात मिळतोय iPhone 12, फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळेल आकर्षक डिस्काउंटचा फायदा

नवी दिल्ली : तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट वर ची बंपर डिस्काउंटसह विक्री होत आहे. सध्या फ्लिपकार्टवर Year-End सेल सुरू आहे. वाचा: सेलमध्ये तुम्ही आयफोन १२ ला ५१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. हे व्हेरिएंट सध्या केवळ काळ्या रंगातच उपलब्ध आहे. याशिवाय फोनचे १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ६४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. iPhone 12 ला गेल्यावर्षी ७९,९०० रुपये सुरुवाती किंमतीत लाँच करण्यात आले होते. सध्या अ‍ॅपलच्या अधिकृत वेबसाइटवर फोन ६५,९०० रुपयात उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास ही किंमत अजून कमी होईल. Flipkart वर आयफोनवर १५,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. सध्या आयफोन १२ चे १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ब्लू, ब्लॅक आणि रेड कलरमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये फोनच्या मिनी व्हर्जनवर देखील ऑफर मिळत आहे. सेलमध्ये iPhone 12 mini च्या ६४ जीबी स्टोरेज मॉडेलला केवळ ४१,४९९ रुपयात खरेदी करता येईल. तर फोनचे १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ५४,९९९ रुपये आणि २५६ जीबी स्टोरेज मॉडेल ६४,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EGP2Xz