मुंबई- छोट्या पडद्यावर प्रचंड गाजणारा कार्यक्रम '' सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बिग बॉसच्या ग्रॅण्ड फिनालेसाठी काही आठवडे बाकी असताना घरात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. या आठवड्यात कोणीही घराबाहेर न गेल्याने घरातील सदस्यांनी सुटकेचा श्वास घेतला होता. परंतु, खेळात आलेल्या आणखी एका ट्विस्टने घरातील सदस्यांच्या मनात धडकी भरवली आहे. घरातून एलिमिनेट झालेले तीन सदस्य या आठवड्यात घरात परतणार आहेत. अभिनेत्री , आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई हे एलिमिनेट झालेले सदस्य या आठवड्यात घरात येणार आहेत. त्यातही परत आल्यावर स्नेहा वर अनेक आरोप करताना दिसत आहे. स्नेहा घरात आल्यावर सगळ्या सदस्यांना भेटते. मात्र आपण घरात असताना आपला विश्वासघात झाल्याचं म्हणते. स्नेहा जेवणाच्या टेबलवर सगळ्यांसमोर जयवर आरोप करते. स्नेहा म्हणते, 'या घरात सुरुवातीपासून माझ्यासोबत कुणी गेम खेळत असेल तर तो जय दुधाणे होता. आपलेच मित्र आपल्या मागून आपली एवढी इज्जत नाही काढत. तू एक मैत्रीण गमावलीस.' या सोबतच स्नेहाने जयला एक सल्लाही दिला. स्नेहा म्हणाली, 'मालिकने तुमको बहुत बडा बनाया, अपनी हरकतोंसे खुद को छोटा मत करो. (तुला देवाने खूप मोठं बनवलंय स्वतःच्या वागण्याने स्वतःलाच छोटा बनवू नको.)' स्नेहाने सगळ्यांसमोर जयवर आरोप केला की त्याने तिच्या मैत्रीचा, तिच्या भावनांचा आणि घरातील वास्तव्याचा वापर करून तिचा विश्वासघात केला. याशिवाय स्नेहा म्हणते की तिने जयला उत्कर्ष आणि मीरासोबत तिला घराबाहेर काढण्यासाठी बोलताना पाहिलंय. त्यानंतर जय मात्र स्नेहाच्या बोलण्याने दुखावलेला दिसतोय. जयला खरंच प्रश्चाताप होतोय की आता पण तो नाटक करतोय असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. यासोबतच स्नेहाला ही गोष्ट आधी कळाली असती तर ती अजूनही घरात असती असंही नेटकरी म्हणत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pu9Ax1