Full Width(True/False)

Best Mobile Phones: भन्नाट फीचर्ससह येणारे फोन शोधताय? २५ हजारांच्या बजेटमधील ‘हे’ आहेत सर्वोत्तम हँडसेट

भारतीय बाजारात आज वेगवेगळ्या फीचर्ससह येणारे शेकडो स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे नक्की कोणता फोन खरेदी करावा याबाबत गोंधळ निर्माण होतो. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काळजी करण्याचे कारण नाही. बाजारात २५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे अनेक चांगले फोन्स उपलब्ध आहेत. कंपन्या या प्राइस रेंजमध्ये अनेक शानदार स्मार्टफोन्स सादर करतात. २५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही Qoo Z5, Motorola Edge 20 Fusion, OnePlus Nord CE 5G, Samsung Galaxy F62 आणि Mi 10i सारखे स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला पॉवरफुल बॅटरी, प्रोसेसर, शानदार डिस्प्ले आणि फोटोग्राफीसाठी दमदार कॅमेरा मिळेल. तुम्ही इतरांना गिफ्ट देण्यासाठी देकील हे शानदार फोन्स खरेदी करू शकता. फोनच्या किंमती आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया.

Samsung Galaxy F62
Samsung Galaxy F62

Samsung Galaxy F62 स्मार्टफोनमध्ये ६.७० इंच Super AMOLED Plus डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. यात ऑक्टा कोर Samsung Exynos ९८२५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि रियरला ६४ + १२ + ५ + २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ७००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे.

​iQoo Z5
​iQoo Z5

iQoo Z5 स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ७७८G प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. यात फ्रंटला १६ मेगापिक्सल आणि यात रियरला ६४ + ८ + २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर पॉवरसाठी ४४ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला २३,९९० रुपयात खरेदी करू शकता.

Mi 10i
Mi 10i

Mi 10i मध्ये ६.६७ इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. यात १.८ GHz ऑक्टाकोर Qualcomm Snapdragon ७५०G प्रोसेसर मिळतो. यामध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि १०८ + ८ + २ +२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. यात ४८२० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला २१,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

Motorola Edge 20 Fusion
Motorola Edge 20 Fusion

Motorola Edge 20 Fusion मध्ये ६.७० इंच ओलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Dimensity ८००U प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि रियरला १०८ + ८ + २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. मोटोरोलाच्या या फोनमध्ये ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१,४९९ रुपये आहे.

OnePlus Nord CE 5G
OnePlus Nord CE 5G

OnePlus Nord CE 5G मध्ये ६.४३ इंच Fluid AMOLED डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ७५०G प्रोसेसर दिला आहे. यात फ्रंटला १८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि रियरला ६४ + ८ + २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GaKUAn