Full Width(True/False)

अमिताभ बच्चन यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहणार क्रिती सेनन, महिन्याचं भाडं आहे तरी किती?

मुंबई : बॉलिवूडमधील शहेनशाह अर्थात यांची मुंबईसह देशा परदेशात मोठी प्रॉपर्टी आहे. अमिताभ यांचा अंधेरीत असलेल्या ड्युप्लेक्स फ्लॅट देखील आहे. अमिताभ यांचा हा फ्लॅट क्रिती सेनन हिने दोन वर्षांसाठी भाड्याने घेतला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांचा हा फ्लॅट अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला रस्त्यावरील अटलांटिस या इमारतीमध्ये आहे. हा फ्लॅट २७ आणि २८ व्या मजल्यावर आहे. या ड्युप्लेक्स फ्लॅटचे महिन्याचे भाडे १० लाख रुपये आहे आणि त्यासोबत चार गाड्यांसाठी पार्किंग स्पेस देखील आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रितीने हा फ्लॅट भाड्याने घेतला असून त्याचे अॅग्रीमेंट १२ नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत केले आहे. हिने या फ्लॅटसाठी ६० लाख रुपये डिपॉझिट भरले आहे. हा फ्लॅट अमिताभ बच्चन यांनी एफ्रिल २०२१ मध्ये ३१ कोटी रुपयांहून अधिक किंमतीमध्ये खरेदी केला आहे. कृति सैननच्या कामाबाबत सांगायचे तर ती 'मिमी' या सिनेमात दिसली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे भरपूर कौतुक झाले होते. आता कृतिकडे बच्चन पांडे, आदिपुरुष, भेडिया आणि गणपत यांसारख्या सिनेमात ती दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pMhty0