मुंबई: गेली दोन वर्षे सिनेसृष्टीची परिक्षा घेणारे होती. करोनामुळं आर्थिक संकट तर सरत्या वर्षात अनेक दिग्गज कलाकार हे जग कायमचे जग सोडून गेले. अचानक जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. २०२१मध्ये दिग्गज अभिनेत दिलीप कुमार ते तरुण अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचं निधन झालं. १) दिलीप कुमारया यादीत पहिले नाव ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचे येते. ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार यांचे मूळ नाव मोहम्मद युसुब खान हे होते.परंतु दिलीप कुमार यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आपल्या वडिलांच्या भीतीने युसुब खान हे नाव बदलून दिलीप कुमार करून घेतले.दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली पाकिस्तान मधील पेशावर या शहरात झाला होता.७ जुलै रोजी त्यांचा वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले. वयाच्या ९८ वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. २) सिद्धार्थ शुक्लाबिग बॉस १३ या रियालिटी शो विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा २ सप्टेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला . सिद्धार्थाच्या अशा अचानक निधनाने सर्वानाच धक्का बसला होता.वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्याने गर्लफ्रेंड शहनाज गिल हिच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला . ३) पुनित राजकुमारकन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचा २९ ऑक्टोबर २०२१ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.पुनिताच्या अशा अचानक निधनाने सर्वच क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात आली होती होती. ४) ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचे १६ जुलै २०२१ रोजी निधन झाले होते.अनेक चित्रपटात आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या सुरेखा यांना खरी लोकप्रियता बालिका वधू या टीव्ही मालिकाने दिली.या मालिकेत त्यांनी दादीसा हे पात्र साकारले होते. २०१९ साली त्यांना बधाई हो या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.तर संपूर्ण अभिनयाच्या करियरमध्ये त्यांना तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एक फिल्मफेयर पुरस्कार ही मिळाला आहे. ५)शशिकला महाराष्ट्राच्या सोलापूर मध्ये जन्मलेल्या अभिनेत्री शशिकला यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ साली एका मराठी कुटुंबात झाला होता. ७० च्या दशकात आपल्या बोल्ड व्यक्तिमत्वामुळे आणि अभिनयामुळे सतत चर्चेत असणाऱ्या दिवंगत अभिनेत्रीचा ५ एप्रिल २०२१ मध्ये मृत्यू झाला होता. ६) राज कौशल२०२१ मध्ये सिद्धार्थ शुक्ला याच्या मृत्यू नंतर सर्वात मोठा धक्का हा अभिनेत्री मंदिरा बेदी हीचा नवरा राज कौशल याच्या मृत्यूने बसला होता.वयाच्या अवघ्या ५० व्य वर्षी त्याचा ३० जून २०२१ रोजी अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता.राज कौशल हा चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीमध्ये काम करायचा.त्याने 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू', 'माय ब्रदर निखिल' आणि 'अँथोनी कौन है' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. अभिनेत्री मंजिरा बेदी सोबत त्याने १९९९ साली लग्न केले होते. ज्यातून त्यांना वीर नावाचा एक मुलगा आहे. ७)राजीव कपूरदिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा भाऊ व राज कपूर यांचा लहान मुलगा राजीव कपूर यांचा यावर्षी फेब्रुवारी २०२१ मध्ये मृत्यु झाला होता.त्यांचेही हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते.मोजक्याच चित्रपटात काम केलेल्या राजीव यांना खरी ओळख 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटाने दिली. राजीव हे रणधीर कपूर आणि ऋषि कपूर यांचे लहान भाऊ होते.ते अभिनेते सहनिर्माते आणि दिग्दर्शक सुद्धा होते.९ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले होते. ८) अमित मिस्त्री चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेते अमित मिस्त्री यांचे २३ एप्रिल २०२१ रोजी मुंबईत हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते.प्रसिध्द टिव्ही मालिका तेनाली रामा हिने त्यांना खरी देशभर ओळख दिली होती.२०१७ साली प्रदर्शित झालेली ही मालिका ऐतिहासिक पात्र तेनाली रामन याच्या जीवनावर आधारित होती.तसेच अमित मिस्त्री यांनी 'क्या कहना' या चित्रपटात अभिनेत्री प्रीति झिंटा हिच्या लहान भावाची भूमिका साकरली होती.यासह त्यांनी 'तेनाली रामा', 'मैडम सर' आणि ॲमेझॉन प्राईम प्रदर्शित 'बंदिश बैंडिट्स' या चित्रपटात मोठ्या भूमिकेत काम केले होते.तसेच एक चालीस की लास्ट लोकल, 'शोर इन द सिटी' आणि 'यमला पगला दीवाना' या चित्रपटा मधये काम केले आहे. ९) अनुपम श्याम ठाकूर (सज्जन सिंह)मन की आवाज प्रतिज्ञा या टिव्ही मालिके मध्ये ठाकूर सज्जन सिंह यांची भूमिका साकारणारे ६३ वर्षीय अभिनेते अनुपम श्याम यांचे ऑगस्ट २०२१ मध्ये निधन झाले आहे.ते अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. १०) विक्रमजीत कंवरपाल करोना आजराने बॉलिवूड मधील अनेक कलाकार निधन पावले आहेत.यात लोकप्रिय टिव्ही आणि चित्रपट अभिनेते विक्रमजीत कंवरपाल यांचे ही नाव आहे.वयाच्या ५२ वर्षी त्यांचा कोविड आजाराने मृत्यु झाला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pGgxMO