मुंबई : बॉलिवडूचा दबंग खान अर्थात ने त्याचा ५६ वा वाढदिवस पनवेल येथील अर्पिता फार्म हाऊसवर मोठ्या दणक्यात साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी सलमानने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कुटुंबातील घरातील सदस्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारही आवर्जून उपस्थित होते. सलमानला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी १३ कोटींचा फ्लॅटपासून ७३ हजारांच्या सोनसाखळीपर्यंत अनेक बहुमूल्य भेटवस्तू मिळाल्या. कतरिनाने दिले सोन्याचे ब्रेसलेट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ने सलमानला वाढदिवसाच्या दिवशी सोन्याचं ब्रेसलेट भेट म्हणून दिलं. या ब्रेसलेटची किंमत सुमारे २ ते ३ लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. जॅकलिन फर्नांडिसने दिलं आरएसचे घड्याळ सलमान खान याची जवळची मैत्रीण नेही त्याला महागडं गिफ्ट दिलं. जॅकलिनने सलमानला त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून १० ते १२ लाख रुपये किंमतीचं आरएसचं घड्याळ दिलं. संजय दत्तने दिलं हिऱ्याचं ब्रेसलेट संजय दत्त आणि सलमान खान यांची खूप चांगली मैत्री आहे. आपल्या लाडक्या मित्राच्या वाढदिवसाला संजयने हिऱ्याचं ब्रेसलेट दिले असून त्याची किंमत सुमारे ७ ते ८ लाख रुपये असल्याची चर्चा आहे. सोहेल खानने दिली बीएमडब्ल्यू बाईक सलमानचा लहान भाऊ सोहेल खान याने आपल्या लाडक्या भावाला बीएमडब्ल्यू एस १००० आरआर दिली ही गाडी भेट म्हणून दिली. या गाडीची किंमत सुमारे २३ ते २५ लाख रुपये इतकी आहे. अरबाज खानने दिली ऑडी सलमानचा भाऊ अरबाजने मोठ्या भावाला वाढदिवसा निमित्त एक ऑडी आरएस क्यू८ गाडी गिफ्ट म्हणून दिली. या गाडीची किंमत २ ते ३ कोटी इतकी आहे. अनिल कपूरने दिलं लेदर जॅकेट अनिल कपूर आणि सलमान खान यांच्यातील जिव्हाळा सर्वांना माहिती आहे. आपल्या या लाडक्या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनिल कपूर यांनी सलमानला २७ ते २८ लाखांचं लेदर जॅकेट भेट म्हणून दिलं. शिल्पा शेट्टीने दिलं ब्रेसलेट सलमानची जवळची मैत्रीण आणि त्याची सहकलाकार असलेल्या शिल्पा शेट्टीने देखील त्याला मौल्यवान भेटवस्तू दिली. शिल्पाने सलमानला सोने आणि हिऱ्याचं ब्रेसलेट दिलं. या ब्रेसलेटची किंमत सुमारे १६ ते १७ लाख रुपये इतकी आहे. सलीम खान यांनी दिलं आलिशान घर सलमानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी त्यांच्या मुलाला वाढदिवसाची भेट म्हणून एक आलिशान घर दिलं आहे. हे घर जुहू येथील एका इमारतीमध्ये असून त्याची किमत १२ ते १३ कोटी रुपये इतकी आहे. आयुष शर्माने दिली सोन्याची चेन सलमान खानचा मेहुणा आणि अर्पिता खानचा नवरा आयुषने देखील एक छानसी भेटवस्तू दिली. आयुषने त्याला सोन्याची चेन भेट म्हणून दिली आहे. याची किंमत सुमारे ७२ हजार रुपये इतकी आहे. अर्पिताने दिले रोलेक्सचे घड्याळ सलमानची लाडकी बहिण अर्पिताने देखील भावाला वाढदिवसाची भेट दिली आहे. अर्पिताने सलमानला १५ते १७ लाख रुपयांचं रोलेक्सचं घड्याळ दिलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Hqt5h0