Full Width(True/False)

रोमँटिक डेटवर ट्विंकलला नाही तर 'या' अभिनेत्रीला घेऊन जाणार अक्षय कुमार

मुंबई : बॉलिवूडमधील बेस्ट कपलचा जेव्हा विषय येतो तेव्हा आणि या जोडीचे नाव अग्रक्रमाने समोर येते. अक्षय आणि ट्विंकलला आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. लग्नाआधी अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. अर्थात लग्नानंतर अक्षयचे नाव कोणत्याही अभिनेत्रीसोबत जोडले गेले नाही. परंतु त्याची एक जुनी मुलाखत समोर आली आहे. त्या मुलाखतीमध्ये अक्षयने रोमँटिक डेटवर ट्विंकलबरोबर नाही तर या अभिनेत्रीसोबत जायचे असल्याची इच्छा व्यक्त केली होती. अक्षय कुमारने पहिल्यांदा २०१९ मध्ये रणवीर सिंहसोबत करण जोहरच्या टॉक शोमध्ये सहभागी झाला होता. मुलाखतीच्या या कार्यक्रमात करणने अक्षयला विचारले होते की, 'जर तुझे लग्न झाले नसते आणि तुला एखाद्या अभिनेसोबत रोमँटिक डिनरला जायचे असेल तर कुणाला घेऊन जाशील?' त्यावर अक्षय कुमारने लगेचच उत्तर दिले की . लंच डेटला गेल्यावर तिच्यासोबत तिच्याच मुलीबद्दल गप्पा मारायच्या आहेत. अक्षयचे हे उत्तर ऐकून करण त्याला हसत हसत म्हणतो की 'मला असे वाटते की,याचे ट्रेनिंग तुला तुझ्या बायकोनेच दिले आहे.' दरम्यान, सध्या अक्षय कुमार त्याच्या बायकोचा ट्विंकल खन्ना हिचा वाढदिवस मालदीवमध्ये साजरा करण्यासाठी मादवीला गेले आहेत. सोशल मीडियावर या दोघांनी त्यांचे सुट्ट्यांचा आनंद घेणारे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. अक्षयने देखील त्याच्या कामातून मोठा ब्रेक घेतला आहे.२९ डिसेंबर रोजी ट्विंकलचा वाढदिवस आहे. तसेच नवीन वर्षाचे स्वागतही ते तिथेच करणार आहेत. अक्षयच्या कामाबद्दल सांगायचे तर आनंद एल राय दिग्दर्शित त्याचा 'अतरंगी रे' हा सिनेमा रिलीज झाला आहे. याशिवाय अक्षय कुमार रक्षा बंधन, पृथ्वीराज, राम सेतु, बच्चन पांडे, ओह माय गॉड २ हे सिनेमे पुढच्या वर्षी रिलीज होणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Jqf4Sl