Full Width(True/False)

Xiaomi Pad 5 Pro: Xiaomi ने लाँच केले या दमदार टॅबलेटचे नवीन व्हेरिएंट, मिळेल ८GB रॅम आणि ८,६००mAh बॅटरी

नवी दिल्ली : शाओमीने आपल्या सीरिजच्या स्मार्टफोन्ससह बाजारात लोकप्रिय चे नवीन व्हेरिएंट लाँच केले आहे. कंपनीने टॅबचे ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट लाँच केले आहे. कंपनीने या टॅबलेटला याच वर्षी ऑगस्टमध्ये लाँच केले होते. टॅबला ६ जीबी रॅम आणि १२८/२५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केले होते. वाचा: Pad 5 Pro च्या नवीन व्हेरिएंटची किंमत २,९९९ युआन (जवळपास ३५,१६६ रुपये) आहे. चीनमध्ये टॅब प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. याचा सेल ३१ डिसेंबरपासून सुरू होईल. लाँच ऑफरनंतर याची किंमत ३,०९९ युआन (जवळपास ३६,३४० रुपये) होईल. Xiaomi Pad 5 Pro चे फीचर आणि स्पेसिफिकेशन्स या टॅबमध्ये ११ इंच LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २५६०x१६०० पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि कॉन्ट्रॅस्ट रेशिया १५००:१ आहे. यामध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळते. टॅबमध्ये स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट, ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ८,६०० एमएएचची बॅटरी दिली आहे. Mi Pad 5 चे प्रोटेक्टिव केस देखील लाँच शाओमीने टॅबच्या नवीन व्हेरिएंटसोबतच Mi Pad 5 प्रोटेक्टिव केसचे नवीन व्हाइट व्हेरिएंट देखील लाँच केले आहे. प्रोटेक्टिव्ह केसची खास गोष्ट म्हणजे याचा कीबोर्डप्रमाणेही वापर करता येईल. या केसला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले असून, याची किंमत ३९९ युआन (जवळपास ४,६७८ रुपये) आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32yiKRA