मुंबई : सरत्या वर्षात म्हणजे २०२१ मध्ये ओटीटीवर सुमारे ४०० सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित झाल्या. यातील काही वेब सीरिज आणि सिनेमांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले तर काही कलाकृती कधी आल्या आणि गेल्या हेच मुळी कळले नाही. मात्र, यातील काही सिनेमा, वेब सीरिजने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. बेव सीरिजचा विचार केला तर त्यामध्ये फॅमिली मॅन २ ही सर्वाधिक लोकप्रिय ठरली. फॅमिली मॅन २ राज आणि डीके यांनी दिग्दर्शित केलेल्या फॅमिली मॅन २ या बेव सीरिजमध्ये मनोज बाजपेयी याची प्रमुख भूमिका आहे. ही वेब सीरिज सर्वाधिक लोकप्रिय ठरली. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रसारित झाली. मनी हाइस्ट दुस-या क्रमांकावर मनी हाइस्ट ही वेब सीरिज आहे. नेटफ्लिक्सवरून प्रसारित झालेल्या मनी हाइस्टच्या शेवटचे पाच भाग अतिशय उत्कंठावर्धक आहेत. मनी हाइस्टचा शेवटचा सिझन हा दोन भागांत प्रसारित करण्यात आला होता. पहिल्या भागामध्ये पाच एपिसोड तर दुस-या भागामध्ये पाच एपिसोड प्रसारित करण्यात आले. कथानकात येणारे चढ-उतार, ताण-तणाव या सगळ्यांमधून प्रेक्षकांना अपेक्षित असा शेवट झाला. त्यामुळे प्रेक्षकांना ही सीरिज फारच आवडली स्क्विड गेम ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोरीअन वेब सीरिज मोठ्या आवडीने पाहिल्या जातात. स्क्विड गेम ही कोरिअन बेव सीरिज सरत्या वर्षामध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरली. या सीरिजमध्ये संपूर्ण दुनियेमध्ये स्क्विड गेम या गूढ खेळाने खळबळ उडवून दिलेली असते. या खेळामध्ये ज्यांना पैशांची आवश्यकता आहे असे नागरिक सहभागी होतात. ४५६ खेळाडूंना एका गूढ ठिकाणी बंद करून ठेवले जाते आणि तिथे ते ४५.६ बिलियन कोरिअन रुपये मिळवण्यासाठी खेळ खेळतात. इनसाइड एज इनसाइड एज या वेब सीरिजचा तिसरा सिझन अॅमेझॉनवर प्रसारित झाला. याच्या आधीचे दोन सिझनलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. क्रिकेट खेळावर ही वेब सीरिज आधारित आहे. या खेळातील सत्ताकेंद्र, पैसा, प्रसिद्धी यावर प्रकाश टाकला आहे. इनसाइज एज सीझन ३ मध्ये विवेक ओबेरॉय, ऋचा चढ्ढा, सयानी गुप्ता, तनुज वरवानी, सपना पब्बी यांच्यासह अनेक कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्पेशल ऑप्स १.५ स्पेशल ऑप्सचा दुसरा सिझन यावर्षी प्रदर्शित झाला. या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला होता. स्पेशल ऑप्स सीझन १.५ द हिंमत स्टोरी दाखवण्यात आली आहे. ही कथा २००१ मध्ये घडलेली दाखवली आहे. जेव्हा हिंमतने रॉ एजेंट म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हाचे कथानक दाखवले आहे. ही सीरिज डिस्ने हॉटस्टार या ओटीटीवरून प्रसारित झाली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sH5wwk